मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने एका ओव्हरमध्ये लगावले ७ सिक्स

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने एका ओव्हरमध्ये लगावले ७ सिक्स

महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने तुफानी बॅटिंग केली. त्याने २२० धावांच्या इनिंगमध्ये १६ षटकार लगावले. उत्तर प्रदेश सारख्या बलाढ्य टीमवरुद्ध विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये त्याने ही कामगिरी केली. यूपीने या मॅचमध्ये ६ गोलंदाजांना संधी दिली. ऋतुराजने फक्त एक गोलंदाज सोडून बाकी सर्वांच्या बॉलिंगवर षटकार ठोकले. ऋतुराजने शिवा सिंह या गोलंदाजाविरोधात सर्वाधिक सिक्स मारले. शिवा सिंह आता २३ वर्षांचा असून तो डावखुरा फिरकी गोलंदाज आहे.

ऋतुराज गायकवाडनं (Ruturaj Gaikwad) विश्वविक्रमाला गवसणी घातलीय. उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्यानं एका षटकात सात षटकार मारण्याचा पराक्रम केलाय. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरलाय. ऋतुराज गायकवाड सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. भारताचा माजी स्टार फलंदाज युवराज सिंहनं (Yuvraj Singh) १५ वर्षांपूर्वी एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला होता आणि त्याच्या या खेळीची आठवण जागवणारी फटकेबाजी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडनं केलीय.

विजय हजारे करंडकाच्या क्वार्टर फायनलमध्ये महाराष्ट्राविरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यात सामना खेळवण्यात आला. महाराष्ट्राचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडनं या सामन्यात तब्बल द्विशतकी खेळी केली. पण ४९ व्या ओव्हरमध्ये त्यानं केलेला कारनामा जागतिक रेकॉर्ड बनला. ४९ वी ओव्हर घेऊन आलेल्या यूपीचा डावखुरा स्पिनर शिवा सिंगला चांगलेच धुतले. त्यानं प्रत्येक चेंडूवर सिक्सरची नोंद केली. त्यात पाचवा बॉल शिवा सिंगनं नो टाकला. त्यावरही ऋतुराजनं सिक्सर लगावला आणि अख्या ओव्हरमध्ये सात सिक्सर्ससह ४३ धावा वसूल केल्या. लिस्ट ए क्रिकेटमधला हा आजवरचा मोठा विक्रम ठरला. या विक्रमी कामगिरीसह ऋतुराजने या इनिंगमध्ये द्विशतकही साजरं केलं. त्यानं १५९ बॉल्समध्ये १० फोर आणि तब्बल १६ सिक्सर्ससह २२० धावा ठोकल्या.

हे ही वाचा : 

Raj Thackeray राज ठाकरे पाच वर्षांनी उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून पद मुक्त होण्याचे संकेत

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version