MCA Election : अजिंक्य नाईक ठरले MCA च्या नव्या अध्यक्षपदाच्या विजयाचे मानकरी..

१०७ मतांनी अजिंक्य नाईक विजय "माझा विजय अमोल काळे यांना अर्पित" - अजिंक्य नाईक

MCA Election : अजिंक्य नाईक ठरले MCA च्या नव्या अध्यक्षपदाच्या विजयाचे मानकरी..

क्रिकेट म्हंटल की गल्ली पासून दिल्लीपर्यंत खेळला जणारा, आबालवृद्धांसाठी सदाबहार असणारा असा हा खेळ आहे. याच जागतिक क्रिकेटचा केंद्रबिंदू असलेल्या मुंबई क्रिकेटचा अध्यक्ष ठरला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA Election) निवडणुकीत अजिंक्य नाईक विजयी झाले आहेत. अजिंक्य नाईक यांना एमसीएचे माजी अध्यक्ष शरद पवार गटाचा पाठिंबा होता. त्यांनी संजय नाईक यांचा १०७ मतांनी पराभव केला आहे. MCA अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांना २२१ तर त्यांचे प्रतिस्पर्धी संजय नाईक यांना ११४ मतं मिळाली. या निवडणुकीत एकूण ३३५ जणांनी मतदान केलं होतं. नाईक विरुद्ध नाईक झालेल्या या थेट लढतीमध्ये अजिंक्य नाईक विजयी झाले आहेत. संजय नाईक यांना भाजपा नेते आणि बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांचा पाठिंबा होता.

मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) चे अध्यक्ष म्हणून अजिंक्य नाईक विजय झाले आहेत. पूर्वीचे अध्यक्ष अमोल काळे यांच्या अचानक निधनानंतर अजिंक्य नाईक आणि संजय नाईक यांच्यात अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांचा विजय झाला असून ते MCA चे आता पर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष झाले आहेत. या निवडणुकीत एकूण ३३५ मते मिळाली असून त्यापैकी अजिंक्य नाईक यांना २२१ मते मिळाली, तर संजय नाईक यांना ११४ मते मिळाली.

अजिंक्य नाईक यांनी आपला विजय MCA चे दिव्यंगत अध्यक्ष अमोल काळे यांना अर्पित केला असून अमोल काळे यांनी सोडलेला वारसा चालवण्याचे वचन यावेळी दिले. ”माझ्या बाजूने मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे आभार. माझा विजय हा अमोल काळे यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा पुरावा आहे. माझे प्रयत्न आणि मेहनत मुंबई क्रिकेटची गुणवत्ता सुधारण्यासाठी असतील आणि अमोल काळे यांचा क्रिकेटचा वारशा पुढे नेण्याचे राहतील,” असे अजिंक्य नाईक यांनी सांगितले. मुंबई क्रिकेटला उच्च शिखरावर नेण्याचा आणि MCA ला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे लक्ष्य असल्याचे यावेळी अजिंक्य नाईक यांनी म्हंटले.

जागतिक क्रिकेटला अनेक दिग्गज खेळाडू देणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनवर यापूर्वीही राजकारण्यांचं वर्चस्व राहिलं आहे. शरद पवार यांच्यासह दिवगंत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी देखील MCA चं अध्यक्षपद भूषवलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यंदा MCA अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. पण, पटोले यांनी काँग्रेस नेते भूषण पाटील यांना पाठिंबा देत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता.  भूषण पाटील यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतल्यानं निवडणुकीत अजिंक्यय नाईक आणि संजय नाईक हे दोन उमेदवार होते.

हे ही वाचा:

SANKASHTI CHATURTHI 2024: जाणूयात संकष्टी चतुर्थी विषयीची महती ; उपवास कसा करावा ते उपवास कसा सोडावा..

BUDGET SESSION OF PARLIAMENT : केंद्रसरकासरची इंटर्नशिप योजना नेमकी काय आहे.. ; जाणूयात सविस्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version