ICC ODI Rankingमध्ये मोहम्मद सिराजचा ‘राज’ सर्व खेळाडूंनी मागे ठरला नंबर १ गोलंदाज

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला मागे टाकून त्याने पहिले स्थान पटकावले आहे. सिराज वनडे फॉरमॅटमध्ये प्रथमच नंबर एकचा गोलंदाज बनला आहे.

ICC ODI Rankingमध्ये मोहम्मद सिराजचा ‘राज’ सर्व खेळाडूंनी मागे ठरला नंबर १ गोलंदाज

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या वनडे मालिकेनंतर मोहम्मद सिराज आता जगातील नंबर वन गोलंदाज बनला आहे. आयसीसीने ताजी वनडे रँकिंग जाहीर केली असून त्यात भारताचा हा वेगवान गोलंदाज गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. सिराजने गेल्या वर्षभरात शानदार गोलंदाजी केली असून त्याचे फळ त्याला अखेर मिळाले आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला मागे टाकून त्याने पहिले स्थान पटकावले आहे. सिराज वनडे फॉरमॅटमध्ये प्रथमच नंबर एकचा गोलंदाज बनला आहे.

मोहम्मद सिराजने २०१९ मध्ये वनडे पदार्पण केले पण काही काळानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सिराजने या फॉरमॅटमध्ये पुनरागमन केले आणि तेव्हापासून तो टीम इंडियाचा सर्वात विश्वासार्ह गोलंदाज बनला आहे. त्याने वनडे फॉरमॅटमध्ये पुनरागमन केल्यापासून सिराजने २० सामने खेळले असून त्यात ३७ बळी घेतले आहेत. विशेषत: पॉवरप्लेमध्ये सिराज प्रत्येक मोठ्या फलंदाजाला क्लीनबोर्ड करताना दिसला.

अलीकडेच सिराजने श्रीलंकेविरुद्धच्या तीन वनडे मालिकेत नऊ विकेट्स घेतल्या होत्या. श्रीलंकेच्या फलंदाजांवर तो कहर करताना दिसला. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्याने चार विकेट्स घेतल्या होत्या. हा सामना त्याच्या मूळ गावी हैदराबादमध्ये खेळला गेला. या मालिकेनंतर सिराज आता ७२९ रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड ७२७ गुणांसह दुसऱ्या तर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट ७०८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. सिराजशिवाय शमीलाही क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. त्याने ११ स्थानांची झेप घेत तो आता ३२ व्या स्थानावर पोहोचला आहे.

फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर बाबर आझम अजूनही पहिल्या स्थानावर आहे. आता भारताचे तीन फलंदाज अव्वल १० मध्ये सामील झाले आहेत. न्यूझीलंडविरुद्ध द्विशतक झळकावणाऱ्या शुभमन गिलने २० स्थानांनी झेप घेत तो आता सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. तो सध्या रोहित शर्मा (८ वे स्थान) आणि विराट कोहली (७ वे स्थान) यांच्या पुढे आहे.

हे ही वाचा:

Maghi Ganesh Jayanti 2023 महाराष्ट्रात विविध ठिकाणी कशी साजरी केली जाते माघी गणेश जयंती

#HarSawalUthega म्हणत प्रजासत्ताक दिनानिमित्त टाटा कंपनीने लहान मुलांसाठी नवी मोहीम घेतली हाती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version