spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IPL च्या शेवटच्या सिझनमध्ये शुभमनच्या बॅटने केल्या सर्वाधिक धावा, यावेळी कोण बनू शकतो नंबर १…

IPL २०२४ ची तयारी सुरू झाली आहे. या हंगामाचा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज गेल्या स्पर्धेत चॅम्पियन ठरला होता. त्याने अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा पराभव केला.

IPL २०२४ ची तयारी सुरू झाली आहे. या हंगामाचा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज गेल्या स्पर्धेत चॅम्पियन ठरला होता. त्याने अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा पराभव केला. २०२३ मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत शुभमन गिल अव्वल स्थानावर होता. त्याने आक्रमक फलंदाजी करताना ८९० धावा केल्या. यावेळीही शुभमन सर्वाधिक धावा करू शकतो. २०२४ च्या मोसमात तो गुजरातचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

शुभमनने गेल्या मोसमात १७ सामन्यात ८९० धावा केल्या होत्या. या कालावधीत त्याने ३ शतके आणि ४ अर्धशतके झळकावली होती. यावेळीही शुभमन सर्वाधिक धावा करू शकतो. गेल्या मोसमात फाफ डु प्लेसिस दुसऱ्या क्रमांकावर होता. शुभमनने १४ सामन्यात ७३० धावा केल्या होत्या. त्याने ८ अर्धशतके झळकावली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या डू प्लेसिसने चमकदार कामगिरी केली होती. डेव्हॉन कॉनवे तिसऱ्या स्थानावर होता. कॉनवेने १६ सामन्यात ६७२ धावा केल्या होत्या. हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने ट्रेड केले आहे. त्यामुळे पुढील मोसमात तो गुजरातकडून खेळणार नाही. पांड्याच्या अनुपस्थितीत शुभमनला गुजरातचे कर्णधारपद देण्यात आले आहे. शुभमनने अलीकडे खूप चांगली कामगिरी केली आहे. तो फॉर्मात आहे. शुभमनने विश्वचषक २०२३ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात नाबाद ८० धावा केल्या होत्या. त्याने नेदरलँड्सविरुद्ध ५१ धावांची खेळी खेळली. श्रीलंकेविरुद्ध त्याने ९२ धावा केल्या होत्या. शुभमन आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनू शकतो.

यावेळी सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप ५ खेळाडूंच्या यादीत यशस्वी जैस्वालचाही समावेश होऊ शकतो. जैस्वाल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भारताकडून खेळणार आहे. २०२३ मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो पाचव्या स्थानावर होता. यशस्वीने १४ सामन्यात ६२५ धावा केल्या होत्या. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली.

हे ही वाचा:

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस गाजण्याची शक्यता

पुणेकरांनी मेट्रोकडे पाठ फिरवली, चार महिन्यात एवढ्या प्रमाणात उत्पादन घटले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss