Thursday, July 4, 2024

Latest Posts

T-20 WORLD CUP मध्ये विजयी झाल्यानंतर MS Dhoni कडून टीमचे कौतुक, म्हणाला…

भारतीय संघाने टी-20 विश्वचषक स्पर्धेतील 17 वर्षांची प्रतीक्षा संपवली. सूर्यकुमार यादव (Surykumar Yadav) चा शेवटच्या षटकातील कॅच आणि जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) च्या बॉलिंगसह भारत टी-ट्वेंटी 2024 विश्वचषकाचा (T20 World Cup 2024) मानकरी ठरला. 2013 नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी (ICC) ट्रॉफी जिंकताना दक्षिण आफ्रिकेला फायनल मध्ये पराभूत केले. सर्वांसाठी चर्चेचा विषय झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला (South Africa) सात धावांनी पराभूत केले आणि दुसऱ्यांदा T 20 विश्व विजेते पदावर नाव कोरले. पहिल्यांदा बॅटिंग करताना भारताने 20 षटकात 7 बाद 176 धावांची मजल मारली. यानंतर दक्षिण आफ्रिकेला भारताने 20 षटकात आठ बाद 169 धावा करून दिल्या. निर्णायक क्षणी अर्धशतक केलेल्या विराट कोहली याला सामनावीर करण्यात आले. तर जसप्रीत बुमराह या खेळाडूला मालिकावीरचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. भारताने मिळवलेल्या या विजयानंतर देशासह जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत असताना पाहायला मिळत आहे आणि याच बरोबर भारतीय संघाचा माजी कर्णधार एम. एस. धोनी (MS Dhoni) यांनी देखील इंस्टाग्राम वर पोस्ट करत रोहित शर्मा सह भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.

“माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. तुम्ही शांत राहून आत्मविश्वास ठेवून जे काही केलं, त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन! सर्व भारतीयांकडून वर्ल्ड कप घरी परत आणल्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. वाढदिवसाच्या अनमोल गिफ्टसाठी तुम्हा सर्वांचे धन्यवाद.” अशी पोस्ट एम एस धोनी (MS Dhoni) यांनी केली आहे.

बार्बाडोस या ठिकाणी आयोजित केलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा बॅटिंग करताना विराट कोहली (Virat Kohli) च्या शानदार 76 धावा आणि अक्षर पटेल (Axar Patel) यांच्या शानदार 47 धावा यामुळे टीम इंडिया (Team India) ने 20 षटकात सात गडी गमावून 176 धावा केल्या. त्यानंतर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ने  शानदार बॉलिंग करत हेनरिक क्लासेनला आउट केले. शेवटच्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी 16 धावांची गरज होती. डेव्हिड मिलर स्ट्राइक वर होता. यावेळी डेव्हिड मिलरने हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या पहिल्याच चेंडूवर सिक्स मारण्याचा प्रयत्न केला. डेव्हिड मिलर जवळपास यशस्वी होत असलेला दिसत असताना सूर्यकुमार यादव (Surykumar Yadav) ने बॉल पकडला. सूर्यकुमार यादव यांनी केलेल्या कामगिरीमुळे डेव्हिड मिलरचा सिक्सर अयशस्वी ठरला. आणि यामुळेच दक्षिण आफ्रिकेचा संघ हा सामना जिंकू शकला नाही.

हे ही वाचा:

MAHARASHTRA ASSEMBLY MONSOON SESSION 2024 : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर आमदार सत्यजित तांबे यांनी उठवला आवाज

MPCB ने केली वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा ; आता इंद्रायणी प्रदूषण मुक्त होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss