spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबई इंडियन्सला मिळाली कायरन पोलार्डची रेप्लासिमेंट

IPL Auction 2023 : IPL 2023 च्या मिनी-लिलावापूर्वी (auction), ऑस्ट्रेलियाचा (Australia) उदयोन्मुख अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनवर (Cameron Greene) करोडोंची बोली लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. हे सर्व घडल्यानंतर. कॅमेरूनवर जेव्हा लिलाव सुरू झाला तेव्हा रक्कम कोटींमध्ये बदलली, त्यासोबतच भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचा (Ravichandran Ashwin) अंदाजही खरा ठरला. होय, अश्विनने सप्टेंबरमध्ये त्याच्या यूट्यूब चॅनलवर कॅमेरॉन ग्रीनबद्दल सांगितले होते की त्याला लिलावात विकत घेण्यासाठी फ्रेंचायझी मोठी रक्कम देईल.

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्टार फिनिशर कायरन पोलार्डने (Kieran Pollard) आयपीएलमधून निवृत्ती (Retirement) घेतल्यानंतर त्याची जागा कोण घेणार हा चर्चेचा विषय झाला होता. मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२३ लिलावात त्याची रिप्लेसमेंट शोधली. मात्र त्यांना यासाठी तब्बल १७.५० कोटी रूपये खर्च करावे लागले. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनसाठी पहिल्यापासूनच आक्रमकपणे बोली लावली जात होती. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सने त्याला १५ कोटींपर्यंत पोहचवले. दिल्ली आणि मुंबईमध्येच त्याला आपल्या गटात खेचण्यासाठी रस्सीखेच सुरू होती. अखेर मुंबई इंडियन्सने त्याला १७.५० कोटीला आपल्या गोटात खेचले.

कॅमेरून यांचा जन्म ३ जून १९९९ रोजी झाला. तो एक ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आहे जो वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि पर्थ स्कॉचर्ससाठी अष्टपैलू म्हणून खेळतो. कॅमेरूनने डिसेंबर २०२२ मध्ये भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने भारताविरुद्ध पहिल्या पदार्पणाच्या मालिकेतही शानदार फलंदाजी केली ज्यामध्ये त्याने ३० पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या. आणि या वर्षी नोव्हेंबरमध्ये, त्याला अफगाणिस्तानविरुद्ध T20I पदार्पण करण्याची संधी मिळाली.

हे ही वाचा : 

Maharashtra Assembly Winter Session 2022 विधानमंडळाच्या गेटवर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न IPL Auction 2023 चक्क अनुभवी अजिंक्य रहाणेची स्वस्तात अटोपली बोली

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss