spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबई इंडियन्सचा खेळाडू Vishnu Vinod ने; केरळ क्रिकेट लीगमध्ये केली बहारदार कामगिरी

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) टीम मधून खेळणाऱ्या विष्णू विनोदने (Vinod Vishnu) केरळ क्रिकेट लीग टी-२० (Kerala Cricket League) मध्ये आश्चर्यकारक आणि प्रभावी खेळी खेळली आहे. केरळ क्रिकेट लीग T-२० चा सामना त्रिशूर टायटन्स (Thrissur Titans) आणि अलेप्पी रिपल (Alleppey Ripples) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ३० वर्षाच्या विष्णू विनोदने कमालीची कामगिरी केली. या सामन्यात त्याने केलेल्या खेळीत केवळ ३२ चेंडूत शतक गाठले. त्याने मारलेल्या षटकारांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या या जबदस्त कामगिरीमुळे सगळीकडे त्याची स्तुती केली जात आहे.

केरळ क्रिकेट लीगच्या सामन्यात विष्णू विनोदची बॅट चांगलीच चालली. ३०८ इतक्या स्ट्राईक रेटने ( Strike Rate) बॅटिंग करून त्याने ४५ चेंडूत १३९ धावा (Runs) केल्या, ज्यात ५ चौकार आणि १७ षटकारांचा समावेश आहे. त्याच्या या बहारदार कामगिरीने त्रिशूर टायटन्सने (Thrissur Titans) हा सामना ८ विकेटने (Wickets) सहज जिंकला.

२०२५ च्या आयपीएल लिलावात विनोदवर पैशांचा वर्षाव:
२०२४ च्या आयपीएल सामन्यांमध्ये विष्णू विनोद हा खेळाडू मुंबई इंडियन्समधून खेळत होता. परंतु २०२५ च्या आयपीएल आधी मेगा लिलाव (Ipl Mega Auction) होईल त्यात इतर आयपीएल संघही विनोद विष्णूवर लक्ष ठेवू शकतात. जर हा खेळाडू मेगा लिलावात आला तर तो इतर संघाचे लक्ष्य ठरण्याची शक्यता आहे कारण त्याने त्याची खेळातील ताकद आणि प्रभुत्व दाखवून दिले आहे. विष्णू विनोदची आयपीएल मधील आतापर्यंतची कामगिरी इतकी काही लक्षणीय नाही. आयपीएल मधील त्याने खेळलेल्या ६ सामन्यांमध्ये अवघ्या ३० धावा केलेल्या आहेत. त्यामुळे अश्या परिस्थितीत त्याला मुंबई इंडियन्स पुन्हा संधी देईल का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. केरळ लीगमधील त्याच्या लक्षवेधी कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

हे ही वाचा:

विश्वसेवा करण्यासाठी भगवान बुद्धांचे विचार आत्मसात करणे गरजेचे- Kiren Rijiju

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मान्यवरांनी घेतले श्री गणेशाचे दर्शन

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss