Friday, July 5, 2024

Latest Posts

T 20 WorldCup च्या ‘या’ मुंबईकर खेळाडूंचा CM Shinde यांच्या हस्ते सत्कार

टी-२० वर्ल्डकप (T 20 WorldCup) जिंकून भारतीय संघ मुंबईत दाखल झाला असून मरीन ड्राइव्ह परिसरात मोठ्या जनसमुदायासह विक्ट्री परेड (Victory Parade) आयोजित करण्यात आली होती.  अशातच, ४ जुलै रोजी राज्य सरकारकडून संघातील मुंबईकर खेळाडूंचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल आणि पारस म्हांब्रे यांचा विधिमंडळात सत्कार केला जाणार आहे. पावसाळी अधिवेशनात आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्याकडून याबाबत घोषणा करण्यात आली. या गोष्टीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी संमती दिली आहे. याच पार्श्ववभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पगुच्छ, शाल आणि गणपतीची मूर्ती देऊन टीम इंडियाच्या खेळाडूंचा सत्कार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जैयस्वाल आणि पारस म्हांब्रे या खेळाडूंचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

विश्वविजेता रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैयस्वाल यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. आज वर्षा निवसस्थानी रोहित शर्मा आणि इतर खेळाडू आले होते. त्यावेळी शाल आणि श्रीफळ देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा सन्मान केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियाद्वारे या प्रसंगाचे लाईव्ह प्रेक्षपण केले. आज दुपारी रोहित शर्मा महाराष्ट्रातील खेळाडूंसोबत आज वर्षा निवस्थानवर पोहचला होता. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांचं स्वागत केले. त्यावेळी दोघांमध्ये मराठीमधून गप्पाही झाल्या. विश्वचषकातील प्रसांगावर दीर्घ चर्चा झाली. पारस भांब्रेही यावेळी त्यांच्यासोबत होते. एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानावर झालेल्या या कार्यक्रमात प्रताप सरनाईकही उपस्थित होते. या सत्कारानंतर हे ४ खेळाडू विधानभवनात जाणार आहेत. विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये सत्कार होणार आहे. त्यासाठी विधानभवनात लोककलाकार जमले आहेत.

विधानभवनात मुंबईकर खेळाडूंचं तुतारी वाजवून स्वागत केलं जाणार आहे. तसेच राज्य सरकारने ४ मुंबईकर खेळाडूंना प्रत्येकी १ कोटी रुपये बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे. तर वानखेडे स्टेडिअमवर टीम इंडियाच्या सत्काराचा कार्यक्रम झाला. जय शाह यांनी या ठिकाणी टीम इंडियाचा १२५ कोटी रुपये देऊन गौरव केला. या कार्यक्रमासाठी बीसीसीआयचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. हजारो चाहत्यांसमोर यावेळी रोहित शर्मा, विराट कोहली यांनी भावनिक भाषण दिलं. विश्वविजेत्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी गुरुवारी मुंबईमध्ये लाखोंचा जनसागर उसळला होता. मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विश्वविजेत्यांची ओपन डेक बसमधून ऱॅली काढण्यात आली होती. त्यावेळी चाहत्यांचा जनसागर रस्त्यावर उतरला होता. कधीही न थांबणारी मुंबई जगज्जेत्यासाठी रस्त्यावर उतरली होती.

हे ही वाचा:

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss