spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नीरज चोप्रानं पुन्हा एकदा देशाची मान उंचावली, डायमंड लीग जिंकणारा पहिला भारतीय

ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेता भारतीय खेळाडू नीरज चोप्राने पुन्हा एकदा देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. नीरजने आता डायमंड लीग फायनलचे विजेतेपद पटकावले आहे. गुरुवारी येथे ऐतिहासिक डायमंड लीग ज्यूरिखमध्ये ट्रॉफी जिंकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय ठरला आहे. नीरजने रात्रीची सुरुवात फाऊल थ्रोने केली. मात्र, त्याने दुसऱ्या प्रयत्नात ८८.४४ मीटर थ्रो केला आणि स्पर्धेवर स्वतःच ऐतिहासिक नाव कोरण्यासाठी पुरसा ठरला.

सकाळच्या नाश्त्यासाठी पटकन होणारी बेसन टोस्टची रेसिपी

नीरज चोप्रा डायमंड लीग जिंकणारा पहिला भारतीय भालाफेकपटू ठरला होता. दरम्यान नीरजने जुलै महिन्यात अमेरिकेतील जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. मात्र याचस्पर्धेतदरम्यान त्याला काही दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला बर्मिंगहममधील राष्ट्रकुल स्पर्धेला मुकावे लागले होते. पण भारताच्या या अवघ्या २४ वर्षाच्या नीरज चोप्राने या दुखापतीतून सावरत २६ जुलैला झालेल्या लुसानेमध्ये पहिल्या प्रयत्नातच ८९.०८ मीटर भालाफेक करत टायटल आपल्या नावावर केले. त्यावेळी नीरजवर दुखापतीचा काही परिणाम झालाय असे वाटत नव्हते. नीरज चोप्रा २०१७ आणि २०१८ मध्ये डायमंड लीग फायनल्ससाठी पात्र झाला होता. तो २०१७ला सातव्या तर २०१८ मध्ये चौथ्या स्थानावर पोहचला.

हेही वाचा : 

लाडक्या बाप्पाचं आज विसर्जन, मिरवणुकीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रानं वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक जिंकत यूएसमध्ये भारताचा तिरंगा फडकावला. या पदकासह नीरज चोप्रानं तब्बल वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील तब्बल १९ वर्षांची प्रतिक्षा संपवली.

आरोग्यासाठी गुणकारी आल्याचे फायदे

Latest Posts

Don't Miss