spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नीरज चोप्रा ठरला सुवर्ण पदाचा मानकरी

भालाफेकपटू नीरज चोप्रा याने नविन विक्रम केला आहे.

टोकियो ऑलम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून भालाफेकपटू नीरज चोप्रा याने नविन विक्रम केला आहे. फिनलँड मध्ये सुरू असलेल्या पावो नूर्मी गेम्स मध्ये नीरज चोप्रा याने 89.30 मीटर भाला फेकला. निरजने ऑलम्पिक मध्ये यश मिळवले असले तरीही या स्पर्धेत रोप्यपदकावर समाधान मानावे लागले.
नीरजच्या प्रयत्नाने 86.92 मीटर भाला फेकला दुसऱ्या प्रयत्नांमध्ये 89.30 मीटर भाला फेकत ऑलम्पिक मधील आपला 87.58 मीटर भालाफेकीचा विक्रम मोडला. त्यानंतरच्या फेरीत मात्र नीरजला उत्तम कामगिरी करता आली नाही. त्यामुळे तो दुसऱ्या क्रमांकावर आला असून त्याला रौप्यपदक मिळालं आहे.
फिनलँड च्या ओलिव्हर हेलेंडर याने 89.93 मीटर भाला फेक टाकून सुवर्ण पदक जिंकले आहे. 7 ऑगस्ट 2021 रोजी टोकियो ऑलम्पिक मध्ये 87.58 मीटर भालाफेक करत नीरजने सुवर्ण पदक जिंकले आहे. त्यामुळे देशभरातून त्याचे कौतुक केले जात आहे.

Latest Posts

Don't Miss