नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने घेतला गोलंदाजीचा निर्णय

नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने घेतला गोलंदाजीचा निर्णय

भारत आणि न्यूझीलंड (India and New Zealand) यांच्यातील तिसरा व अखेरचा एकदिवसीय सामना (ODI match) बुधवारी म्हणजेच आज ख्राईस्टचर्च (Christchurch) खेळवला जाणार असून यामध्ये पावसाचा व्यत्यय येणार नाही, अशी दोन्ही संघांना आशा आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधण्यासाठी टीम इंडिया आज मैदानात न्यूझीलंडशी दोन हात करत आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाऊस पडून त्याने भारताच्या मालिका विजयाच्या आशा धुळीस मिळवल्या.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आजक्राइस्टचर्च येथे खेळला जाणार आहे. टीम इंडिया सध्या १-० ने पिछाडीवर आहे. ऑकलंडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने सात गडी राखून विजय मिळवला. त्याचवेळी हॅमिल्टनमध्ये खेळलेला दुसरा वनडे पावसाने वाहून गेला. आता मालिकेचा निर्णय तिसऱ्या वनडेत होणार आहे. पावसामुळे (due to rain) सामना रद्द झाला किंवा भारताने सामना गमावला तर संघ मालिका गमावेल. शिखर धवन (Shikhar Dhawan) अँड कंपनीसाठी विजय हा एकमेव पर्याय आहे. टीम इंडिया जिंकल्यास मालिका १-१ अशी होईल.

टीम इंडियाला तिसऱ्या वनडेत पहिला धक्का बसला आहे. सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) यावेळी मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला, अॅडम मिलने (Adam Milne) त्याला झेलबाद केले. या डावाच्या सुरुवातीपासून शुभमन लयीत दिसत नव्हता आणि त्याने लवकरच त्याची विकेट गमावली. भारताची धावसंख्या ८.४ षटकात ३९/१.

हे ही वाचा : 

Green tomatoes हिरवे टोमॅटो खाण्याचे जाणून घ्या फायदे

Hair Tips केस धुण्यासाठी करू नका गरम पाण्याचा वापर

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version