NZ vs IND: भारत आणि न्यूझीलंड सराव सामना रद्द

NZ vs IND: भारत आणि न्यूझीलंड सराव सामना रद्द

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील सराव सामन्यात पावसानं खोडा घातला. ब्रिस्बेनच्या (Brisbane) गबा (Gabba) स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, हा सामना आज दुपारी १.३० वाजता सुरु होणार होता. तर, यापूर्वी अर्धातास म्हणजेच १ वाजता दोन्ही संघातील कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरणार होते. ब्रिस्बेनमध्ये संततधार पावसामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सराव सामना रद्द करण्यात आला आहे. याच मैदानावर आज पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सराव सामना खेळवण्यात आला होता.

बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, ब्रिस्बेनमध्ये पाऊस पडत आहे आणि त्यामुळे सामना वेळेवर सुरू न होण्याची स्थिती दिसत नाही. यामुळेच बीसीसीआयनं ५-५ षटकांच्या सामन्यासाठी कट ऑफ टाइम जाहीर केला होता, जो स्थानिक वेळेनुसार ८:४६ आणि भारतीय वेळेनुसार दुपारी ४.१६ आहे. तोपर्यंत पाऊस थांबल्यास हा सामना ५-५ षटकांचा खेळवला जाईल असं म्हटलं होतं पण आता पावसामुळे भारत विरोध न्यूझीलंड सामना रद्द करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं ६ धावांनी विजय मिळवला. ब्रिस्बेनच्या गब्बा येथे खेळण्यात आलेल्या सराव सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतानं केएल राहुल, सूर्यकुमारच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियासमोर २० षटकात सात विकेट्स गमावून १८७ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ २० षटकात १८० धावांपर्यंत मजल मारू शकला.

भारत संघामध्ये केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दीक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेले, रवीचंद्रन अश्विन, हर्षल पटेल. भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, दीपक हुडा, ऋषभ पंत,

हे ही वाचा :

‘मशाल’ उद्धव ठाकरेंन सोबतच; समता पक्षाची याचिका हायकोर्टानं फेटाळली

शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण निशाणी गोठवण्याचं पाप यांनी केलं; भास्कर जाधव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version