IPL 2023 : २०२३च्या आयपीएल मध्ये रवींद्र जडेजाच्या संघ बदलण्याच्या निर्णयावरून एमएस धोनी म्हणाला…

IPL 2023 : २०२३च्या आयपीएल मध्ये रवींद्र जडेजाच्या संघ बदलण्याच्या निर्णयावरून एमएस धोनी म्हणाला…

कायम क्रिकेट प्रेमींना उत्सुकता असते आयपीएलची. आता सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कपनंतर क्रिकेटच्या चाहत्यांना पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामाची उत्सुकता लागली आहे. आयपीएलच्या पुढील हंगामासाठी मिनी लिलाव डिसेंबरमध्ये होणार आहे. याआधी, १० फ्रँचायझींपैकी कोणत्याही संघाला त्यांचे काही खेळाडू सोडायचे असतील तर त्यांची यादी सादर करावी लागणार आहे. दरम्यान या परिस्थितीत अनेक संघ आपल्या काही बड्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.

हेही वाचा : 

Sindhudurg : जिल्हा नियोजन सभेदरम्यान नारायण राणे व विनायक राऊत यांच्यात शाब्दिक खडाजंगी

यामध्ये दिल्ली कॅपिटल्सचा शार्दुल ठाकूर आणि चेन्नई सुपर किंग्जचा रवींद्र यांचा समावेश आहे. पण तसे होणार नाही.
या सीझनमध्ये आयपीएलच्या इतिहासात प्रथमच चेन्नई संघ फायनलपर्यंत पोहोचू शकला नव्हता. त्यामुळे आयपीएलमधून लवकर बाहेर पडल्यामुळे आणि चेन्नईचा माजी कर्णधार रविंद्र जडेजा सोबतच्या वादामुळे चेन्नई संघ चर्चेत आला होता. या चर्चेनंतर रविंद्र जडेजा चेन्नई संघ सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र याच वादावर आता पडदा पडल्याचे बोलले जात आहे.

एमएस धोनीने हा मिटवला वाद

आयपीएल २०२२ दरम्यान चेन्नईचे टीम मॅनेजमेंट आणि रविंद्र जडेजामध्ये मोठा वाद झाला होता. या वादामुळे तो चेन्नईच्या शेवटच्या सामन्यातून बाहेर झाला होता. त्यानंतर स्पर्धेचा हंगाम संपल्यानंतर मॅनेजमेंट सोबतच्या वादामुळे रविंद्र जडेजा चेन्नईची साथ सोडणार असल्याची चर्चा होती. मात्र या वादावर आता पडदा पडला आहे. हा वाद मिटवण्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने मोलाची भूमिका बजावली आहे. दरम्यान हा वाद मिटल्यामुळे आता रविंद्र जडेजा पुन्हा पिवळ्या जर्सीत मैदानात उतरताना दिसणार आहे. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र,कर्नाटक राज्यपालांच्या उपस्थितीत दोन राज्यांच्या समन्वयावर बैठक, पण संवेदनशील सीमावादावर चर्चाच नाहीच

Exit mobile version