भारतीय महिला बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिने शनिवारी महिला एकेरी उपांत्य फेरीत जपानची नामांकित सेईना कावाकामीचा पराभव करून सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे. यावर्षी सदस्य मोदी इंटरनॅशनल आणि स्विस ओपन मध्ये दोन सुपर 300 विजेतेपद पटकावणाऱ्या दुहेरी ऑलिंपिक पदक विजेत्या सिंधू ने 32 मिनिटे सुरू असलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जपानच्या सेईना कावाकामीचा 21-15, 21-7 असा पराभव केलेला आहे.
#PVSindhu storms into final of #SingaporeOpen Tournament. She defeats Japanese world No. 38 Saena Kawakami 21-15, 21-7 in the semifinals. This is the third time this year that Sindhu has moved into the final of a tournament.
File Pic pic.twitter.com/AzYcBWHM2k
— All India Radio News (@airnewsalerts) July 16, 2022
सायना नेहवाल पराभूत
सायना नेहवाल आणि एचएस प्रणॉय यांचे आव्हान संपुष्टात आले. लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाने चीनच्या जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावरील बिंग जियाओला हरवून सूर गवसल्याची ग्वाही दिली होती. परंतु उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जपानच्या डावखुऱ्या अया आहोरीविरुद्ध तिने 21-13, 22-20 अशी हार पत्करली.
हेही वाचा :
औरंगाबाद व उस्मानाबाद नामांतराच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा