पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केली अध्यक्ष Ramiz Raja यांची हकालपट्टी, नजम सेठी असतील पुढील अध्यक्ष

इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांची मालिका पाकिस्तानने गमावल्यामुळे रमीज राजा यांची खुर्ची जाऊ शकते, अशी चर्चा होती.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केली अध्यक्ष Ramiz Raja यांची हकालपट्टी, नजम सेठी असतील पुढील अध्यक्ष

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नजम सेठी आता अध्यक्षपद सांभाळतील. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नजम सेठी यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांची मालिका पाकिस्तानने गमावल्यामुळे रमीज राजा यांची खुर्ची जाऊ शकते, अशी चर्चा होती.

इंग्लंड मालिकेदरम्यानच माजी बोर्ड सदस्यांच्या नेतृत्वाखालील गटाने रमीझला पीसीबीच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मोहीम सुरू केली होती. पडद्यामागे काही खेळ खेळला जात असल्याचा दावा या गटाने केला. पीसीबीमधील बदलांसाठी देशाच्या कायदा मंत्रालयाने बोर्डाचे संरक्षक पंतप्रधान यांचीही भेट घेतली होती. नजम सेठी बद्दल बोलायचे तर ते जून २०१३ ते जानेवारी २०१४, फेब्रुवारी २०१४ ते मे २०१४, ऑगस्ट २०१७ ते ऑगस्ट २०१८ पर्यंत PCB चे अध्यक्ष होते. त्यांची ही चौथी टर्म असेल.

इम्रान खान यांनी

२०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खानच्या पक्षाने बहुतांश जागा जिंकल्यानंतर नजम सेठी यांनी पीसीबी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पीसीबी बोर्डाच्या घटनेनुसार, अध्यक्षपदासाठी उमेदवारांची नियुक्ती पंतप्रधान करतात. यानंतर, ‘बोर्ड ऑफ गव्हर्नर्स’ त्यांच्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करते. रमीझ राजाला २०२१ मध्ये पीसीबीचे अध्यक्ष बनवण्यात आले.

इम्रान खान यांच्यानंतर शाहबाज शरीफ देशाचे पंतप्रधान झाल्यावर रमीझ राजा यांची खुर्ची जाऊ शकते, असे मानले जात होते. मात्र, रमीझने आपली खुर्ची बराच काळ टिकवण्यात यश मिळवले. आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघाची खराब कामगिरी आणि अनेक आरोपांनंतर त्यांना हटवण्यात आले.

काही दिवसांपूर्वी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनीही २०२३ च्या आशिया कपचे यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावून घेण्याबाबत बोलले होते. भारतीय संघ २०२३ आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नसल्याचे जय शाह यांनी सांगितले होते. या स्पर्धेसाठी तटस्थ ठिकाण निश्चित केले जाईल. यानंतर रमीझ राजाने पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या वर्ल्डकपमधून संघाचे नाव मागे घेण्याची धमकीही दिली. मात्र, लोकांना असेच उत्तर हवे असल्याचे त्यांनी नंतर सांगितले.

हे ही वाचा:

Aryan Khan case क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

Corona Guidelines कोरोना संदर्भात मोठी अपडेट समोर, विमानतळांवर आजपासून सुरू होणार कोरोना चाचणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version