पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीचे मोठं व्यक्तव्य म्हणाला, हार्दिक पांड्यासारखा खेळाडू…

पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीचे मोठं व्यक्तव्य म्हणाला, हार्दिक पांड्यासारखा खेळाडू…

आशिया चषकात गोलंदाजांनी खराब कामगिरी केल्यामुळे टीम इंडिया आशिया चषकातून बाहेर पडली. त्यामुळे टीम इंडियाच्या गोलंदाजांवरती सुद्धा सोशल मीडियावर जोरदार टीका झाली होती. ऑस्ट्रेलिया टीम विरुद्ध झालेल्या मालिकेत टीम इंडिच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सुर्यकुमार यादव, विराट कोहली, हार्दीक पांड्या यांची नावे आहेत.टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका जिंकल्यामुळे विश्वचषकात नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी याने एका वाहिनीवर मुलाखत देताना हार्दिक पांड्यासारखा खेळाडू पाकिस्तानच्या टीममध्ये नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

हेही वाचा : 

Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या मोदीं विरोधात वक्तव्यानंतर, चक्क राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली पाठराखण

आफ्रिदी म्हणाला की, पाकिस्तानने आसिफ अली, खुशदी शाह, मोहम्मद नवाज आणि शादाब खान यांसारख्या खेळाडूंवर विश्वास ठेवला आहे, परंतु त्यापैकी कोणीही हार्दिक पांड्याने भारतासाठी जेवढे सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे तितकी कामगिरी करू शकले नाही. अशा प्रकारचा फिनिशर पंड्यासारखा खेळाडू आमच्याकडे नाही. हार्दीक पांड्यासारखा खेळाडू पाकिस्तानच्या टीममध्ये असायला हवा, तशी भूमिका कोण निभावतंय हे सुद्धा पाहावं लागेल.

थायरॉईड नियंत्रणात आण्यासाठी घरगुती उपाय

शाहिद आफ्रिदीचे ट्विट चर्चेत

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकातील सामान कोण जिंकेल, असे एका चाहत्याने सोशल मीडियावर विचारले होते. या चाहत्याच्या प्रश्नाला शाहिद आफ्रीदीने ट्विटरवर उत्तर दिलं आहे. आफ्रिदीने यावेळी उत्तर देताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही संघाची बाजू घेतलेली नाही. पण त्याचवेळी हा सामना कोण जिंकेल, याचे समर्पक उत्तर त्याने दिले आहे.आफ्रीदी हा नेहमीच पाकिस्तानच्या बाजूने बोलत असल्याचे पाहायला मिळत होते. पण आफ्रीदीने यावेळी क्रिकेटच्या भाषेत उत्तर दिले आहे. चाहत्याच्या या प्रश्नाचे उत्तर देताना आफ्रिदीने म्हटले आहे की, “जो संघ कमी चुका करेल, तोच संघ विजयी ठरेल.”

भारतात PFI संघटनेवर बंदी, मोदी सरकारचा मोठा निर्णय

Exit mobile version