Paris Olympics 2024 : थोडक्यात हुकली संधी पण तिनं कोरलं इतिहासात सुवर्ण पानं

Paris Olympics 2024 : थोडक्यात हुकली संधी पण तिनं कोरलं इतिहासात सुवर्ण पानं

मनू भाकर ही अतिशय निष्णात अशी नेमबाजपटू आहे. तिच्यामुळे भारताला बऱ्याच वर्षांनी ऑलिम्पिक पदके प्राप्त झाली. ब्रॉन्झ पदक पटकावल्या नंतर आता तिची वर्णी २५ मीटरच्या नेमबाजी स्पर्धेसाठी लागली होती. ही सुवर्ण संधी तिच्यापासून हिरावून घेतली गेली.आज या स्पर्धेचा सामना रंणार होता. सर्वोत्तम पूर्वतयारी, एकाग्रता, विजय आणि ‘सेलिब्रेशन’ सारे काही सफाईदार.. नेमबाज मनू भाकरसाठी यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील हा जणू शिरस्ताच झाला आहे. आज, शनिवारी तिला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाच्या हॅटट्रिकची संधी मिळाली होती. ही संधी अगदी थोडक्यासाठी निसटून गेली. तिने २५ मीटर पिस्तूलच्या अंतिम फेरीत धडक मारली त्यावेळी सर्व भारतीयांचे डोळे हे तिच्या सामन्याकडे कायम लागून होते.

मनु भाकरला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सलग तिसरं पदक पटकावण्याची संधी हुकली. २५ मीटर एअर पिस्टल प्रकारात तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. ८ व्या सिरीजमध्ये ती चौथ्या स्थानी राहिल्यानं ती एलिमिनेट झाली. पण एका ऑलिम्पिकमध्ये एका पेक्षा जास्त पदक पटकावणारी ती भारताची पहिलीच ऑलिम्पियन ठरली असून तिने इतिहास घडवला आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्टल प्रकारात वैयक्तिक आणि मिश्र अशा दोन स्पर्धात तिने कास्य पदक पटकावलं आहे.२५ मीटर पिस्टल क्वालिफिकेशनमध्ये ४० पैकी फक्त ८ जणांना अंतिम फेरीत जागा पटकावता आली होती. तर फायनलमध्ये १० सिरीजमध्ये ५० शॉट मारले गेले.. पहिल्या तीन सिरीजनंतर एलिमिनेशन सुरू झाले. मनु भाकर ५ सिरीजनंतर तिसऱ्या स्थानावर होती. पण ८ सिरीजनंतर ती चौथ्या क्रमांकावर राहिली. यामुळे ती पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडली.

फायनलमध्ये ग्रीन हाइटवर निशाणा साधणे गरजेचे असते. रेड लाइटवरचा निशाणा ग्राह्य धरला जात नाही अर्थात यामुळे सबंधित खेळाडूच्या गुणांमध्ये कमी होते सुरुवातीला प्रत्येक नेमबाजाने तीन सिरीजमध्ये प्रत्येकी ५ शॉट्स खेळले. एकूण १५ शॉट्स खेळण्याची संधी मिळते. यानतर प्रत्येक नेमबाजाने ५ शॉट्सची एक सिरीज खेळली त्यानंतर सुवर्ण पदकाचा निकाल निश्चित होईपर्यंत एक-एक खेळाडू स्पर्धेतून बाहेर होत गेला.

भारताच्या या कामगिरीमुळे देशाची मान अभिमानाने उंचावली असून एकाच आयपीएलमध्ये तब्बल तीन पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. परंतु तिची पॅरिस ऑलम्पिक मधील कामगिरी वखाडण्याजोगी होती.

हे ही वाचा:

Paris Olympics 2024 :Manu Bhaker यांची अंतिम फेरीत धडक ; भारताची यशशिखराकडे होणार घोडदौड सुरु

Railway Mega Block Update : रविवारी घराबाहेर पडताय तर त्याआधी ‘हे’ वाचा

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version