Paris Olympics 2024 : आधी Vinesh Phogat आणि आता Antim Panghal; नक्की चाललय तरी काय आणि कुस्तीपटूच का ?

Paris Olympics 2024 : आधी Vinesh Phogat आणि आता Antim Panghal; नक्की चाललय तरी काय आणि कुस्तीपटूच का ?

भारताची कुस्तीवीर विनेश फोगट (Vinesh Phogat) हिला काल (७ ऑगस्ट ) पॅरिस ऑलम्पिक (Paris Olympic 2024) मधून १ अवघ्या १०० ग्राम वजनामुळे थेट अपात्र ठरवण्यात आले. तिने वजन कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न वाया गेले आणि आता ती थेट इस्पितळात ऍडमिट आहे. या मागे भाजप सरकारचा हात असल्याचे विनेशचे कुटुंबिय सांगत आहेत. हे प्रकरण ताज असतानाच आता पॅरिस ऑलम्पिक मधून मोठी घडामोड समोर आली आहे. भारतीय महिला कुस्तीपटू अंतिम पंघाल (Antim Panghal) अडचणीत सापडली आहे. अंतिम पंघालवर शिस्तभंगाचे आरोप केले जात आहेत. त्यामुळे तिला थेट पॅरिस सोडण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. एकीकडे विनेश फोगाटला अपात्र ठरवणे तर दुसरीकडे अंतिम पंघालवर कारवाई करत असल्यामुळे भारताला दुहेरी धक्का बसत आहे. या संपूर्ण कुस्ती संघाच्या एकंदरीत पॅरिस मधील घडामोडींमध्ये कुस्तीपटूंनाच लक्ष्य केल्याचे दिसून येते. या मागे राजकीय घडामोडी आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याच सोबत युपीमधील महिलांचे प्रकरण आहे का असे अनेक प्रश्न या निमित्ताने इथे उपस्थित होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला कुस्तीपटू अंतिम आणि तिच्या बहिणीची पॅरिसमधून हकालपट्टी करण्यात येणार आहे. अंतिमच्या बहिणीला चुकीचे ओळखपत्र दाखवून ऑलिम्पिक कॅम्पसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताना सुरक्षा अधिकाऱ्यांनी पकडले. त्यामुळे तेथील फ्रेंच अधिकाऱ्यांकडून तिच्यावर शिस्तभंगाचा आरोप करण्यात आला. या प्रकरणाची भारतीय ऑलिम्पिक संघटनेने गंभीर दखल घेतली आहे. त्यानंतर भारतीय कुस्तीपटू अंतिम, तिची लहान बहिण आणि स्पोर्ट्स  स्टाफची रवानगी पुन्हा भारतात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 पॅरिसमध्ये नक्की काय झालं ?

महिलांच्या ५३ किलो वजनी गटातील आपला पहिला सामन्यात गमावल्यानंतर कुस्तीपटू अंतिम स्पर्धेतून बाहेर पडली. तिचे नामांकित प्रशिक्षक भगतसिंह आणि वास्तविक प्रशिक्षक विकास ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथे ती गेली. तिने आपल्या बहिणीला स्वतःचे ओळखपत्र दिले आणि जिथे सामना होता, तिथून आपले सामान आणण्यास सांगितले. सांगितल्याप्रमाणे अंतिमची बहीण अंतिमचे ओळखपत्र घेऊन स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झाली, मात्र अंतिमचे सामान घेऊन परतताना तिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडले. त्यानंतर अंतिमच्या बहिणीची पोलिसांनी चौकशी केली आणि तिचा जबाब नोंदवण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यासाठी १९ वर्षीय ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन कुस्तीपटू अंतिमलाही तिचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी बोलावले.

पॅरिस विलेज नक्की आहे तरी काय ?

ऑलम्पिक व्हिलेज हे खास ऑलम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या सोयीसाठी तयार करण्यात आलं असून येथे प्रवेशासंदर्भातील नियम फार कठोर आहेत. या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी प्रत्येक खेळाडूला विशेष कार्ड देण्यात आले आहेत. अंतिमच्या नावाने असलेले हेच कार्ड तिच्या बहिणीने वापरण्याचा प्रयत्न करुन नियमांचं उल्लंघन केल्याने तिच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. आता या कारवाईमुळेच अंतिमसहीत तिच्या सोबतच्या चौघांना पॅरीस सोडावं लागणार आहे.

हे ही वाचा :

आधी पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, मालदीव आणि आता बांग्लादेश ; चीनची धूर्त नीती भारतावर डाव साधण्याच्या प्रयत्नात?

“कोणीच स्वत:ला देवापेक्षा मोठं मानू नये”; बांग्लादेश प्रकरणावरून Uddhav Thackeray यांचा खडाजंगी टोला

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version