Paris Olympics 2024 : भारताच्या खात्यात ‘रौप्य’ पदकाचा मान; Neeraj Chopra याने तोडला आपलाच ऑलम्पिक रेकॉर्ड ठरला इतिहासाचा मानकरी

Paris Olympics 2024 : भारताच्या खात्यात ‘रौप्य’ पदकाचा मान;  Neeraj Chopra याने तोडला आपलाच ऑलम्पिक रेकॉर्ड ठरला इतिहासाचा मानकरी

युरोप खंडातील फ्रांस देशाची राजधानी पॅरिस शहरामध्ये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ मध्ये खेळवण्यात येईल. या स्पर्धेतील अनेक खेळ पॅरिसमध्ये असून इतर १६ शहरांत ही काही स्पर्धा होणार आहे. ऑलम्पिक म्हंटल की सर्वात जास्त महत्वपूर्ण असा हा खेळांची स्पर्धा आहे. या स्पर्धेत सुमारे १०,५०० खेळाडू ३२ खेळांतील ३२९ स्पर्धांमध्ये भाग घेत असतात. भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना असो की हॉकीची लढत असो, नेहमी रंगतदार सामने होत असतात.

पॅरीस ऑलम्पिकमधील भालाफेक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान असाच सामना रंगला. त्यात भारताच्या नीरज चोप्राने इतिहास निर्माण केला. पाच थ्रो फाऊल केल्यानंतर त्याने आपलाच ऑलम्पिक रेकॉर्ड तोडला. टोकियो ऑलम्पिकमधील गोल्डन थ्रो पेक्षा वेगाने भाला फेकत रौप्य पदक जिंकले. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यावेळी त्याने ८७.५८ मीटर लांब भाला फेकला होता. आता पॅरीसमध्ये ८९.४५ मीटर लांब भाला फेकला. पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम याने नवीन इतिहास निर्माण केला. त्याने पाकिस्तानसाठी सुवर्ण पदक मिळवले. अर्शद नदीम याने ९२.९७ मीटर थ्रो करत ऑलिम्पिकमधील नवीन विक्रम केला.

आधीच्या सामन्यात नीरजने उत्तम कामगिरी बजावली आहे. नीरज चोप्रा हा भाला फेकच्या अंतिम फेरीत दाखल झाला होता. नीरजने पहिल्या प्रयत्नामध्ये ८९.३४ मीटर भाला फेकला आणि त्याने थेट अंतिम फेरीत स्थान पटकावले होते. पात्रता फेरीत नीरज चोप्राची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. त्याचबरोबर या मोसमातील देखील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्यामुळे नीरजने पहिल्याच प्रयत्नात जग जिंकलेलं होतं. कारण नीरजसारखी कामगिरी कोणालाही करता आली नव्हती. त्यामुळे नीरज आता सुवर्णपदकापासून फक्त एक पाऊल दूर होता. त्यामुळे नीरज सलग दुसरे सुवर्णपदक पटकावणार का, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. काल(८ ऑगस्ट) ला पुढील सामना रंगला.

कसा होता हा भारत पाकिस्तान सामना ?

भालफेक स्पर्धेत भारताचा नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम यांच्यात सामना रंगला. सुरुवातीपासूनच हा अंतिम सामना भारत विरुद्ध पाकिस्तान असाच झाला. कारण दुसऱ्या फेरीपासूनच अर्शद नदीम पहिल्या तर नीरज चोप्रा दुसऱ्या क्रमांकावर होता. अर्शद नदीम याने अंतिम फेरीत ९२.९७ मीटर भाला फेक करून पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेचा जुना विक्रम मोडीत काढला. नदीमने पहिल्या प्रयत्नात फाऊल केला, त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात ९२.९७ मीटर लांब भाल फेकत नवीन विक्रम नोंदवला. नदीमने ६ पैकी २ प्रयत्नांत ९० मीटरच्या पुढे भाला फेकला.

या सामन्यातील इंडिअन स्टार नीरज चोप्रा याची कामगिरी होती वाखाडण्याजोगी :

भारतीय स्टार नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. त्याने ८९.४५ मीटर अंतरावर भाला फेकला. ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. नीरज चोप्रा याने त्याच्या ६ पैकी ५ प्रयत्नात फाऊल केले. पहिल्याच प्रयत्नात नीरजला फाऊल झाला, त्याचा पाय रेषेला लागला. यानंतर नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८९.४५ मीटर भाला फेकला. यानंतर नीरजने तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या प्रयत्नात फाऊल केले. नीरज याने यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये ७ ऑगस्ट २०२१ रोजी सुवर्णपदक जिंकले होते. त्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी ८९.४५ मीटरचा थ्रो केला होता.

हे ही वाचा :

गणेशोत्सवापूर्वी Mumbai Goa Highway होणार आता खड्डेमुक्त्त; Nitin Gadakari यांनी दिले आश्वासन

अजितदादांचं Pink Politics उधळणार रंग; महाराष्ट्र जनसन्मान यात्रेला झाला आरंभ

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version