spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Paris Olympics 2024 : Manu Bhaker यांची अंतिम फेरीत धडक ; भारताची यशशिखराकडे होणार घोडदौड सुरु

युरोप खंडातील फ्रांस देशाची राजधानी पॅरिस शहरामध्ये २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ मध्ये खेळवण्यात येईल. या स्पर्धेतील अनेक खेळ पॅरिसमध्ये असून इतर १६ शहरांत ही काही स्पर्धा होणार आहे. ऑलम्पिक म्हंटल की सर्वात जास्त महत्वपूर्ण असा हा खेळांची स्पर्धा आहे. या स्पर्धेत सुमारे १०,५०० खेळाडू ३२ खेळांतील ३२९ स्पर्धांमध्ये भाग घेत असतात. मनू भाकर हि अतिशय निष्णात अशी नेमबाज आहे. तिच्या मुले भारताला बऱ्याच वर्षांनी ऑलिम्पिक पदके प्राप्त झाली. ब्रॉन्झ पदक पटकावल्या नंतर आता तिची वर्णी २५ मीटरच्या नेमबाजी स्पर्धेसाठीची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. सर्वोत्तम पूर्वतयारी, एकाग्रता, विजय आणि ‘सेलिब्रेशन’ सारे काही सफाईदार.. नेमबाज मनू भाकरसाठी यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील हा जणू शिरस्ताच झाला आहे. आज, शनिवारी तिला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाच्या हॅटट्रिकची संधी आहे. तिने २५ मीटर पिस्तूलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. लक्ष्य सेननेही उपउपांत्य फेरीत विजय मिळवत आगेकूच केली. पी. व्ही. सिंधू, सात्त्विक-चिराग, निखत झरीन अशा पदकाच्या दावेदार असणाऱ्या खेळाडूंच्या पराभवामुळे आलेली निराशा दूर झाली ती मनूची अंतिम फेरी आणि भारतीय हॉकी संघाच्या ऑस्ट्रेलियावरील विजयामुळे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शुक्रवारी भारतासाठी समाधान आणि दिलासा देणारे निकाल आले. गुरुवारी पदकाचे दावेदार असणारे अनेक खेळाडूंचा झालेला पराभव यामुळे भारतीय चाहते नाराज झाले होते. मात्र शुक्रवारी मनू भारकने अंतिम फेरीत धडक मारली त्यानंतर भारतीय हॉकी संघाने तब्बल ५२ वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि ग्रुपमध्ये दुसरे स्थान मिळवले. भारताने गेल्या ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा ३-२ असा पराभव केला. त्यानंतर लक्ष्य सेनने उपउपांत्य फेरात प्रवेश केला. आता तो पदकापासून फक्त एक पाऊल दूर आहे.

पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचे नियोजन कसे असेल ?

  • नेमबाजी महिला – स्कीट – पात्रता फेरी -रैझा ढिल्लन आणि माहेश्वरी चौहान – दु. १२.३० पासून महिला – २५ मीटर पिस्तूल (पदक फेरी) – मनू भाकर – दु. १ पासून
  • तिरंदाजी महिला – वैयक्तिक (बाद फेरी) – दीपिकाकुमारी वि. मिचेल क्रोप्पेन (जर्मनी) – दु. १.५२ पासून महिला – वैयक्तिक (बाद फेरी) – भजन कौर वि. दिआंदा चोरुनिसा (इंडोनेशिया) – दु. २.०५ पासून
  • सेलिंग पुरुष – रेस ५ – विष्णू सरवानन – दु. ३.४५ पासून पुरुष – रेस ६ – विष्णू सरवानन – दु. ४.५३ पासून महिला – रेस ५ – नेत्रा कुमानन – सायं ५.५५ पासून महिला – रेस ६ – नेत्रा कुमानन – सायं. ७.०३ पासून
  • बॉक्सिंग पुरुष – उपांत्यपूर्व फेरी – निशांत देव वि. मार्को व्हेर्दे (मेक्सिको) – मध्यरात्री १२.१८ पासून

हे ही वाचा:

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss