Thursday, July 4, 2024

Latest Posts

T20 World Cup जिंकल्याबद्दल PM Modi कडून Team India चे कौतुक, तुम्ही नवीन पिढीच्या….

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १७७ धावांचं आव्हान दिले होते. मात्र, टीम इंडियाने धारदार गोलंदाजी आणि अफलातून फिल्डिंगच्या जोरावर मॅच फिरवली. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला १६९ धावांवर रोखण्यात यश मिळवलं. भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी २० वर्ल्ड कप २०२४ (ICC T20 World Cup 2024) फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात टी २० वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. रोहित शर्माची कॅप्टन म्हणून पहिली आणि खेळाडू म्हणून दुसरी टी २० वर्ल्ड कप ट्रॉफी ठरली. टीम इंडियाने १७ वर्षांपूर्वी म्हणजेच २००७ साली पहिलाच टी २० वर्ल्ड कप जिंकला होता. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचे कोतुक केले आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कॉल कडून सर्व खेळाडूंशी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले.

भारतीय संघाशी बोललो आणि T20 विश्वचषकातील त्यांच्या अनुकरणीय यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कौशल्य आणि उत्साह दाखवला. प्रत्येक खेळाडूची वचनबद्धता खूप प्रेरणादायी असते, अशा भावना नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केल्या. विराट कोहली (Virat Kohli) ला संपर्क साधला असता, तुमच्याशी बोलून आनंद झाला. फायनलमधील डावांप्रमाणेच तुम्ही भारतीय फलंदाजी शानदारपणे केली आहे. तुम्ही खेळाच्या सर्व प्रकारांमध्ये चमकला आहात. T20 क्रिकेट तुमची आठवण येईल पण मला विश्वास आहे की, तुम्ही नवीन पिढीच्या खेळाडूंना प्रेरित करत राहाल, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

राहुल द्रविड (Rahul Dravid) च्या अतुलनीय कोचिंग प्रवासाने भारतीय क्रिकेटच्या यशाला आकार दिला आहे. त्याचे अतूट समर्पण, धोरणात्मक अंतर्दृष्टी आणि योग्य प्रतिभेचे पालनपोषण यामुळे संघाचा कायापालट झाला आहे. त्यांच्या योगदानाबद्दल आणि पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्यासाठी भारत त्यांचा आभारी आहे. त्याला विश्वचषक जिंकताना पाहून आम्हाला आनंद होत आहे. असे म्हणत त्याचे अभिनंदन करून आनंद झाला असल्याचे मोदींनी म्हटले. तुम्ही उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहात. तुझी आक्रमक मानसिकता, फलंदाजी आणि कर्णधारपद यामुळे भारतीय संघाला नवा आयाम मिळाला आहे. तुझी T20 कारकीर्द कायम लक्षात राहील. आज तुमच्याशी बोलून आनंद झाला, असे मत नरेंद्र मोदींनी रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबत बोलल्यानंतर व्यक्त केले.

हे ही वाचा:

T-20 WORLD CUP मध्ये विजयी झाल्यानंतर MS Dhoni कडून टीमचे कौतुक, म्हणाला…

T-20 World Cup मध्ये भारताची बाजी, ठरले ‘इतक्या’ रकमेचे मानकरी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss