पुण्याच्या अभिजित कटकेने पटकावला हिंदकेसरी किताब

भारतीय शैली कुस्ती महासंघ यांच्या वतीने हिंदकेसरी कुस्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय कुस्तीतील सर्वात मानाची स्पर्धा म्हणजे हिंद केसरी.

पुण्याच्या अभिजित कटकेने पटकावला हिंदकेसरी किताब

भारतीय शैली कुस्ती महासंघ यांच्या वतीने हिंदकेसरी कुस्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय कुस्तीतील सर्वात मानाची स्पर्धा म्हणजे हिंद केसरी. या हिंद केसरी सामन्याचा अंतिम सामना काल दि. ८ जानेवारी रोजी खेळला गेला. यामध्ये अंतिम फेरीत पुण्याचा अभिजीत कटके (Abhijit Katke) आणि हरियाणाचा पैलवान सोमवीर या दोघांमध्ये लढत हि दिसून आली. त्यामुळे हिंद केसरीची गदा महाराष्ट्राकडे जाते की हरियाणाकडे अशी उत्सुकता सर्वांना लागली होती. यामध्ये महाराष्ट्र केसरी ठरलेल्या पैलवान अभिजीत कटके (Abhijit Katke) याने हिंदकेसरी (kesari) किताब पटकावला आहे.

हैदराबाद येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत अभिजीत कटकेने खुल्या गटातून हा मान मिळवला आहे. तेलंगणामधील हिंद केसरी (Telangana Hind Kesari 2023) स्पर्धेतील (Abhijeet Katke) फायनलमध्ये कुस्तीपटू अभिजीत कटके याने हरियाणाचा पैलवान सोमवीर याचा पराभव केला आहे.अंतिम फेरीत अभिजीतने हरियाणाचा पैलवान सोमवीर याचा ५ – ० असा पराभव केला आहे. अभिजीतच्या या विजयानंतर पुण्यात एकच जल्लोष हा दिसून आला आहे. पुण्याच्या अभिजीतने पटकावलेला हिंदकेसरीचा किताब म्हणजे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आणि तितकीच अभिमानाची बाब आहे. अभिजित कटके हा मुळचा पुण्याचा आहे. त्यामुळे त्याच्या विजयानंतर पुण्यात सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात त्याच्या विजयाचा जल्लोष हा साजरा करण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी फटाके देखील फोण्यात आले आहेत.

पहिल्या फेरीत ४ गुणांची आघाडी घेतलेल्या अभिजीतने सोमवीरला आक्रमणाची संधीच मिळून दिली नाही. दुसऱ्या फेरीत देखील नकारात्मक कुस्ती करीत असल्याने पंचांनी सूचना देऊन तीस सेकंदात गुण घेण्याची सूचना दिली. मात्र तीस सेकंदात तो अभिजीतचा भक्कम बचाव भेदण्यात अयशस्वी ठरल्याने पंचांनी अभिजीतला एक गुण दिला. शेवटच्या मिनिटांत सोमवीर आक्रमक झाला. परंतु, अभिजित त्याला एकही गुण मिळू न देता हिंदकेसरीची गदा पटकावली. अभिजीतने धोबीपछाड देत महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. २०१७ मध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर अभिजित कटके याने महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला होता. त्याने हिंद केसरीची मानाची गदा पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय.

हे ही वाचा:

प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व

टोमॅटोचे लोणचे कसे बनवायचे जाणून घ्या एका क्लिकवर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version