spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

FIFA World Cup Final 2022 अर्जेंटिनावर पैशांचा पाऊस!, विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघांवरही FIFA कडून बक्षिसांची लूट

फिफा विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना रविवारी दि. १८ डिसेंबर रोजी खेळला गेला. अंतिम सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८:३० वाजता सुरू झाला होता. लुसेल स्टेडियमवर अर्जेंटिना आणि फ्रान्सचे संघ आमनेसामने आले होते आणि या सामन्यात अर्जेंटिनाचा विजय हा झाला.

FIFA World Cup Final 2022 : फिफा विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना रविवारी दि. १८ डिसेंबर रोजी खेळला गेला. अंतिम सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८:३० वाजता सुरू झाला होता. लुसेल स्टेडियमवर अर्जेंटिना आणि फ्रान्सचे संघ आमनेसामने आले होते आणि या सामन्यात अर्जेंटिनाचा विजय हा झाला. फिफा विश्वचषकाच्या इतिहासात विजेतेपद पटकावण्याची अर्जेंटिनाची ही ३ वेळ ठरली. याआधी अर्जेंटिनानं १९७८ आणि १९८६ साली विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यानंतर तब्बल ३६ वर्षांनी मेसीच्या अर्जेंटिनानं विश्वचषकावर पुन्हा आपलं नाव कोरलं आहे.

फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ मानला जातो. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष फिफा विश्वचषक २०२२ कडे लागले आहे. विश्वचषक ट्रॉफी जिंकणारा संघ विजेतेपदासह करोडो रुपये घेऊन जाईल. फिफा विश्वचषकाची बक्षीस रक्कम खूप जास्त आहे आणि केवळ विजेता संघच नाही तर उपविजेता संघ देखील मालामाल झाला आहे. यासोबतच फिफामधील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांनाही एक ठरावीक रक्कम फिफाकडून दिली जाते.

अर्जेंटिनाच्या लियोनेल मेस्सीचं (Lionel Messi) फिफा विश्वचषक (FIFA World Cup) जिंकण्याचं स्वप्न अखेर साकार झालं. कतारच्या (Qatar) लुसेल स्टेडियमवरच्या अंतिम सामन्यात मेसीच्या अर्जेंटिनानं (Argentina) फ्रान्सचा (France) पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा पराभव केला आणि फिफा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. त्याआधी हा सामना जादा वेळेत ३-३ असा आणि निर्धारित वेळेत २ – २ असा बरोबरीत सुटला होता.

कोणत्या संघाला किती प्राईज मनी?

  • विजेती अर्जेंटीना : ३४७ कोटी रुपये
  • उपविजेता फ्रांस : २४८ कोटी रुपये
  • तिसऱ्या क्रमांकावरील टीम : २२३ कोटी रुपये (क्रोएशिया)
  • चौथ्या क्रमांकावरील टीम : २०६ कोटी रुपये (मोरक्को)

केवळ नॉकआउट सामन्यांत पोहोचणाऱ्या संघांनाच नाही तर विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनाही फिफाकडून काही रक्कम दिली जाते.

 विश्वचषक स्पर्धेत सहभागी प्रत्येक संघाला९- ९ मिलियन डॉलर (दशलक्ष डॉलर्स)

  • प्री-क्वार्टर फायनलमध्ये पोहोचलेल्या संघांसाठी १३ मिलियन डॉलर्सची बक्षीस रक्कम
  • क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झालेल्या संघांसाठी १७ मिलियन डॉलर्स बक्षीस रक्कम

फ्रान्स आणि अर्जेंटिना हेड-टू-हेड –

एकूण सामने: १२
अर्जेंटिना विजयी: ६
फ्रान्स विजयी: ३
अनिर्णीत: ३

 

View this post on Instagram

 

A post shared by Time Maharashtra (@timemaharashtra)

 अर्जेंटिनाचा संघ –

गोलरक्षक: एमिलियानो मार्टिनेझ, जेरोनिमो रुल्ली, फ्रँको अरमानी.
बचावपटू: नहुएल मोलिना, गोंझालो मॉन्टिएल, क्रिस्टियन रोमेरो, जर्मन पेझेला, निकोलस ओटामेंडी, लिसांड्रो मार्टिनेझ, मार्कोस अकुना, निकोलस टॅगलियाफिको, जुआन फॉयथ.
मिडफिल्डर्स: रॉड्रिगो डी पॉल, लिएंड्रो परेडिस, अँलेक्सिस मॅकअलिस्टर, गुइडो रॉड्रिग्ज, अलेजांद्रो गोमेझ, एन्झो फर्नांडीझ, एक्क्विएल पॅलासिओस.
फॉरवर्ड्स: लिओनेल मेस्सी, एंजल डी मारिया, लॉटारो मार्टिनेझ, ज्युलियन अल्वारेझ, निकोलस गोन्झालेझ, जोक्विन कोरिया, पाउलो डायबाला.

फ्रान्सचा संघ –

गोलरक्षक: अल्फान्सो एरिलो, ह्युगो लोरिस, स्टीव्ह मंदाडा
बचावपटू: लुकास हर्नांडेझ, थिओ हर्नांडेझ, इब्राहिम कोनाटे, ज्युल्स कोंडे, बेंजामिन पावार्ड, विल्यम सलिबा, डेओट उपमेकानो, राफेल वाराणे
मिडफिल्डर: एडुआर्डो कॅमविंगा, युसेफ फोफाना, माटेओ गुंडौझी, अँड्रिन रॅबिओट, ऑरेलियन चौमेनी, जॉर्डन वेरेटोट
फॉरवर्ड्स: करीम बेंझेमा, किंग्सले कोमन, उस्माने डेम्बेले, ऑलिव्हियर गिरौड, अँटोइन ग्रिजमन, कायलियन एमबाप्पे, मार्कस थुराम, रँडल कोलो मुआनी

१८ कॅरेट सोन्याचा वापर-

फिफा वर्ल्डकपच्या ओरिजनल ट्रॉफीचं वजन जवळपास ६.१७५ किलो इतकं आहे आणि ती बनवण्यासाठी १८ कॅरेट सोन्याचा वापर करण्यात आला आहे. ट्रॉफीची लांबी ३६.८ सेंटीमीटर आणि व्यास १३ सेंटीमीटर इतका आहे. ट्रॉफीच्या बेसवर मॅलाकाइट स्टोनचे दोन स्तर आवरण देण्यात आलं आहे. १९९४ साली या ट्रॉफीमध्ये थोडा बदल करण्यात आला आणि विजेत्या संघाचं नाव लिहिण्यासाठी ट्रॉफीच्या खाली एक प्लेट लावण्यात आली.

वर्ल्ड कप विजेते संघ-

  • ब्राझील – ५ (१९५८, १९६२, १९७०, १९९४, २००२)
  • जर्मनी – ४ (१९५४, १९७४*, १९९०, २०१४)
  • इटली – ४ (१९३४*, १९३८, १९८२, २००६)
  • अर्जेंटीना – ३ (१९७८*, १९८६, २०२२)
  • फ्रान्स – २ (१९९८*, २०१८)
  • उरुग्वे – २ (१९३०*, १९५०)
  • इंग्लंड – 1 (१९९६*)
  • स्पेन – १ (२०१०)

हे ही वाचा : 

Winter Assembly Session हिवाळी अधिवेशन गाजणार, सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे येणार आमनेसामने

Nashik Gram Panchayat Election 2022 नाशिक जिल्ह्यात मतदान प्रक्रियेला सुरुवात, तर ७ ग्रामपंचायत बिनविरोध

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss