RCBvsKKR, आज ईडन गार्डन्सवर रंगणार कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

आज सर्वांच्या नजरा ईडन गार्डन्सवर (Eden Gardens) असणार आहेत. आयपीएल २०२३ मध्ये (IPL 2023) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आपल्या सुरुवातीच्या पराभवातून पुनरागमन करणार का?

RCBvsKKR, आज ईडन गार्डन्सवर रंगणार कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

आज सर्वांच्या नजरा ईडन गार्डन्सवर (Eden Gardens) असणार आहेत. आयपीएल २०२३ मध्ये (IPL 2023) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आपल्या सुरुवातीच्या पराभवातून पुनरागमन करणार का? आज इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) नववा सामना खेळवला जाणार आहे. आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सला पंजाब किंग्ज विरुद्ध डीएलएस पद्धतीनुसार ७ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. रॉयल चॅलेंजर्स् बंगळुरु च्या संघाने विराट कोहलीच्या दमदार खेळीमुळे मुंबई इंडियन्सवर आठ गडी राखून शानदार विजय मिळवला होता. आज कोलकाता आणि बंगळुरू या डोंघी संघाचा सामना कोकतामधील ईडन गार्डन मैदानावर संध्याकाळी ७.३० वाजता खेळवला जाणार आहे.

इंडियन प्रीमियर लीगचा नववा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी महत्वाचा आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा संघ तब्बल चार वर्षानंतर त्यांच्या घराच्या मैदानावर परतणार आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाचा समतोल बिघडला आहे. यामुळे ईडन गार्डन्स मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याकडे कोलकाताच्या चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे. दुसरीकडे अनेक स्टार खेळाडू असलेला रॉयस चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आपला पहिला सामना जिंकल्यामुळे चुरशी लढतीस सज्ज आहे. ईडन गार्डन स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. ए स्टेडियम आकाराने लहान असल्यामुळे मोठी धावसंख्या पाहायला मिळणार आहे. या मैदानावर दव महत्वाची भूमिका बजावते. दव पडल्यानंतर फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवर मदत होते त्यानंतर धावा काढणं कठीण होते.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संभाव्य प्लेईंग ११
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, मायकेल ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, डीजे विली, अनुज रावत, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आकाश दीप, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, कर्ण शर्मा

कोलकाता नाइट रायडर्स संभाव्य प्लेईंग ११
रिंकू सिंह, नितीश राणा (कर्णधार), वॉरियर, जेसन रॉय, आदि रसेल, सुनिल नारायण, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, टीम साऊदी, वरुण चक्रवर्ती, उमेश यादव

हे ही वाचा : 

RRvsPBKS, दुसऱ्या विजयाची गुढी कोणता संघ उभारणार? राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स

IPL2023, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर

IPL2023, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version