Friday, July 5, 2024

Latest Posts

Rohit Sharma ने मराठीत भाषण करत जिकंले मन, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर….

रोहित शर्माने आपल्या खास शब्दात भाषण केले. मराठीत भाषण करत अनेकांचे मन जिंकले आहे. रोहित शर्माने सूर्यकुमार यादवच्या झेलवरुन केलेल्या वक्तव्याने सभागृहात हशा पिकला.

Team India : टीम इंडियाने ११ वर्षानंतर आयसीसी चषकावर नाव कोरलं. तसेच १७ वर्षानंतर टी२० वर्ल्डकप भारताने जिंकला आहे. विजयानंतर टीम इंडिया भारतात पोहोचली तेव्हा त्यांनी सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आता विश्वविजेता रोहित शर्मा, ऑलराउंडर शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैयस्वाल यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. आज वर्षा निवसस्थानी रोहित शर्मा आणि इतर खेळाडू आले होते.हा सत्कार सोहळा पार पडला. त्यावेळी शाल आणि श्रीफळ देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा सन्मान केला. त्यांनतर हे चारही खेळाडू विधानभवनात गेले. विधान भवनात पहिल्यांदा असा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. खेळाडू पोहचताच तुतारी वाजवून त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यांना पुष्पगुच्छ देऊन लोककलाकारांनी या खेळाडूंचं औक्षण केलं. त्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये आता या खेळाडूंचा खास सन्मान करण्यात येणार आहे. हॉलमध्ये पोहचताच महाराष्ट्र गीत लावण्यात आलं. यावेळी बोलताना रोहित शर्माने आपल्या खास शब्दात भाषण केले. मराठीत भाषण करत अनेकांचे मन जिंकले आहे. रोहित शर्माने सूर्यकुमार यादवच्या झेलवरुन केलेल्या वक्तव्याने सभागृहात हशा पिकला. बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला घरी बसवलं असतं, असं मस्करीत रोहित शर्मा म्हणाला.

सर्वांना माझा नमस्कार.. इथं बोलवल्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं खूप खूप आभार… आमच्यासाठी असा कार्यक्रम केला, त्याबद्दल आभार… काल मुंबईमध्ये जे काही पाहिले, ते स्वप्नवत होतं. विश्वचषक जिंकणं आमचं स्वप्न होतं. 2023 मध्ये संधी थोडक्यात हुकली. सूर्या, दुबे किंवा माझ्यामुळे हे झालं नाही… सर्वांमुळे हे सिद्ध झालं. सर्व सहकारी माझ्यासोबत होते, त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे हे होऊ शकले. प्रत्येक सामन्याचा नायक वेगळा होता.बरं झालं सूर्यकुमार यादव याच्या हातात कॅच बसला नाहीतर त्याला मी पुढे घरी बसवले असते. सर्वांचे खूप खूप आभार…

 

सूर्यकुमार यादव म्हणाला –
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब धन्यवाद, तुम्ही आम्हाला ही संधी दिली. सर्वांना भेटून खूप चांगलं वाटत आहे. जे मी काल बघितलं ते मी कधी विसरु शकत नाही. तसेच मी इथेसुद्धा आज बघतोय, इथलेदेखील क्षण मी कधी विसरु शकत नाही. थँक्यू सो मच. मी काय म्हणू? माझे शब्द संपले आहेत. मला माहिती नाही, मला काय बोलायचं, थँक्यू सो मच”, अशा शब्दांत सूर्यकुमार यादव याने आपल्या भावना व्यक्त केल्या. “इकडे येऊन खूप चांगले वाटले. आमचे बीसीसीआयचे ट्रेझर आशिष शेलार हे सुद्धा काल आम्हाला घ्यायला आले होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी जे काल बघितलं, आपल्या मुंबई पोलिसांनी जे काल केलंय, ते मला वाटत नाही की, कोणी असं करु शकतं. आम्हाला असंच प्रोत्साहन मिळेल, अशी आशा करतो. नंतर परत आपण अजून एक वर्ल्ड कप जिंकू”, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

 

हे ही वाचा:

 
 
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss