टी-२० विश्वचषका आधी रोहित शर्माने घेतली पत्रकार परिषद; बी.सी.सी.आय विरुद्ध पी.सी.बी वादविवादावर त्याच्या पहिल्या प्रतिक्रियेत

टी-२० विश्वचषका आधी रोहित शर्माने घेतली पत्रकार परिषद; बी.सी.सी.आय विरुद्ध पी.सी.बी वादविवादावर त्याच्या पहिल्या प्रतिक्रियेत

भारतीय संघ ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) सज्ज झाला आहे. दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात दुबईत (Dubai) पार पडलेल्या मागच्या टी-२० विश्वचषकात विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात मैदानात उतरणारी टीम इंडियाच्या (Team India) हाती निराशा पडली. पण यंदा ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या टी-२० विश्वचषकाच्या आठव्या आवृत्तीत रोहित शर्मा भारतीय संघाची धुरा संभाळतोय आयसीसी स्पर्धेत भारताचं नेतृत्व करण्याची रोहितची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, रोहित शर्मानं २०२१च्या टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघात नेमके कोणते बदल झाले आहेत? यावर भाष्य केलंय.

मेलबर्नमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याची उलटी गिनती सुरू झाली आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांची तयारी जोरात सुरू आहे. आता सामना सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. ज्यात पाकिस्तानी पत्रकाराने एक प्रश्न विचारला की भारताने पाकिस्तानचा दौरा केला पाहिजे का?. यावर रोहित म्हणाला की, माझे लक्ष फक्त टी-२० वर्ल्ड कपवर आहे. मी याचा विचार करत नाही. याबाबत बीसीसीआय निर्णय घेईल.

“संघ व्यवस्थापकांनी सगळ्यांनाच आपपले निर्णय घेण्याचं स्वातंत्र दिलं आहे. आपल्या निर्णयाचा परिणाम काय होईल? याचा अधिक विचार न करता त्या निर्णयांना मागं सारणं हे टाळलं पाहिजे. तसेच आपला माइंटसेट योग्य असेल तर आपल्याला कशाचेही भय नाही. आम्ही छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्ष दिले आहे. ज्यामुळे खेळाडूला चांगली कामगिरी करता येते”, असं रोहित शर्मानं म्हटलंय.

२०२३ मध्ये आशिया चषक आयोजित करण्यावर सुरू असलेल्याबी.सी.सी.आय विरुद्ध पी.सी.बी वादविवादावर त्याच्या पहिल्या प्रतिक्रियेत, भारताचा कर्णधार रोहित शर्माने अपेक्षितपणे सांगितले की ते सध्या हातात असलेल्या कामावर लक्ष केंद्रित करत आहेत, जो ऑस्ट्रेलियातील टी २० विश्वचषक आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर रविवारी पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी करून आपल्या स्पर्धेची सुरुवात करण्यास उत्सुक असल्याचेही भारताच्या कर्णधाराने सांगितले. बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी पुढील वर्षीच्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारत पाकिस्तानला जाणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर पीसीबीला भारताविरुद्धच्या टी-२० विश्वचषकाच्या सामन्यातून माघार घेण्यासह पाकिस्तान क्रिकेट समुदायाकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या. ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी होणार आहे.

हे ही वाचा :

इस्रोचे सर्वात वजनदार रॉकेट नवीन मिशनसह बाजारपेठेत प्रवेश करणार; कसे आहे हे शक्तिशाली रॉकेट?

Viral Video : व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल; हत्तीने नक्की काय केलं ‘ते’ तुम्हीही पाहा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version