Wednesday, July 3, 2024

Latest Posts

T20 WORLD CUP : Rohit Sharma केले मोठे ट्विट ; सर्व क्रिकेटचाहत्यांना दिले विजयोत्सवाचे आमंत्रण

चक्रीवादळात अडकलेली टीम इंडिया भारतात येण्यासाठी निघाली आहे. तीन दिवसाच्या बातावरण निवळण्याची होटेलमध्ये वाट पाहिल्यानतर टीम इंडियाचे विमान उद्या सकाळी दिल्लीत उतरणार आहे. या सर्व विजयाच्या पार्श्वभूमीवर रोहित शर्मा यांनी ट्विट करत आपल्या देशाप्रती व देशवासीयांप्रतीच्या भावना व्यक्त केल्या आहेत

जगातला सर्वात आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. हा खेळ अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत खेळला जातो. त्यात हा खेळ म्हणजे अगदी आबालवृद्धांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यात सध्या हा विशेष सामना फार जोमाने सुरु आहे. अगदी सर्व मंडळी हा सामना झाडून पाहत आहेत. तो म्हणजे टी २० विश्वचषक २०२४ (ICC T20 World cup 2024)  हा होय. हा टी २० विश्वचषक २ जून २०२४ रोजी सुरु झाला आहे.

या टी २० विश्वचषक २०२४ चा शेवटचा सामना हा २९ जून २०२४ रोजी उत्तम पद्धतीने रंगला. या सामन्यात गेल्या काही दिवसांपासून भारत विजयाच्या दिशेने आगेकूच करताना आपण सर्वानीच पहिला. भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी-२० विश्वचषकावर आपलं नाव कोरले आहे. या सामन्यात भारताचा स्फोटक फंलदाज विराट कोहली (Virat Kohali), वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह (Jasprit Bumrah), अक्षर पटेल आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी मोलाची कामगिरी केली. यांच्या योगदानामुळेच भारताला विजयाला गवसणी घालता आली. तब्बल १७ वर्षांनी हे टी-२० विश्वचषक २०२४ भारताने पटकावले आहे.

चक्रीवादळात अडकलेली टीम इंडिया भारतात येण्यासाठी निघाली आहे. तीन दिवसाच्या बातावरण निवळण्याची होटेलमध्ये वाट पाहिल्यानतर टीम इंडियाचे विमान उद्या सकाळी दिल्लीत उतरणार आहे. या सर्व विजयाच्या पार्श्वभूमीवर रोहित शर्मा यांनी ट्विट करत आपल्या देशाप्रती व देशवासीयांप्रतीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोबतच एक नवी घॊषणा त्यांनी केली आहे. ते म्हणाले कि – “आम्हाला तुमच्यासोबत ह्या खास क्षणाचा आनंद साजरा करायचा आहे. ४ जुलैला सायंकाळी वाजल्यापासून मरीन ड्राईव्हवर विजय यात्रा आणि वानखेडेगर महोत्सव साजरा केला जाणार आहे. विश्वचषक घरी येतोय,”अशी पोस्ट रोहित शर्मा यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर (म्हणजेच पूर्वीचे Twiter) पोस्ट केली आहे.

वर्ल्डकपच्या सेलिब्रेशनसाठी टीम इंडिया मुंबईत येणार आहे. यामुळे हा ओर्ल्डकप पाहण्यासाठी मुंबईत चाहत्यांची मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांकडेही फार कमी वेळ हातात असून या चाहत्यांना आवरण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात करावा लागणार आहे. एअर इंडिषाचे AIC24WC विमानतून भारतकडे यायला निघाले आहे. उद्या सकाळपर्यंत भारतीय दिली आहे तीन दिवसापासून बार्बाडोस मध्ये चक्रीवादळ घोंगावत होते. यामुळे तेथील विमान बंद करण्यात आले होते. त्यामुळे टीम इंडिया या चक्रीवादळात अडकून पडली होती. बुधवारी सकाळी टीम इंडिया भारतात येईल अशी बातमी समोर आली होती.परंतु या चक्रीवादळाचा धोका ढळला नसल्यामुळे भारतीय संघाला तेथे थांबणे बंधन कर्क झाले.

नेमके काय बोलले आहेत रोहित शर्मा ?

“आम्हाला हा खास क्षण तुमच्याबरोबर साजरा करायचा आहे, तर आपण एकत्र येऊन हा आनंद साजरा करुया. त्यासाठी आपण भेटुया विक्टरी परेडमध्ये, ४ जुलैला. नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम, संध्याकाळी ५.०० वाजता.” रोहित यावेळी चाहत्यांना आपल्याबरोबर सेलिब्रेशन करण्यासाठी बोलावले आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने चाहते यावेळी नरिमन पॉइंटला दाखल होतील, यात शंकाच नाही. या सेलिब्रेशन ची उत्सुकता आता शिगेला पोहोचल्याचे चित्र भारतीयांमध्ये तसेच क्रीकरत चाहत्यांमध्ये दिसत आहे.

THE ACADEMY SCHOOL, PUNE (TAS) यांनी केली जागतिक आयआयएमयुएन परिषद आयोजित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss