Saturday, July 6, 2024

Latest Posts

तुम्ही आधीच माझी वाट लावलीय, Rohit Sharma ने कॅमेरामॅनसमोर जोडले हात

काल ( १७ मे २०२४ ) मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (MI vs LSG) हा सामना रंगला होता. या सामन्यामध्ये लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) १८ धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सचे स्पर्धेतील आव्हान आधीच संपले असून ही मुंबई इंडियन्सची शेवटची मॅच होती. यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) मुंबईने काही खास कामगिरी केली नाही. त्यामुळे ते या स्पर्धेच्या बाहेर पडले आहेत. आनंदाच्या आयपीएलमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुंबईचा नवा कर्णधार हार्दिक पांड्या वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा रोहित शर्मा चर्चेत आला आहे.

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर रोहित शर्मा आणि अभिषेक नायर यांच्या गप्पा सुरु होत्या. यावेळी तिथिअसलेल्या कॅमेरामॅनने त्यांच्या संवाद चित्रित केला. हा व्हिडीओ कोलकाता नाईट रायडर्सच्या सोशल मीडिया अकाउंट्स वरून पोस्टही करण्यात आला होता. या संवादातून रोहित शर्माच्या बोलण्यानुसार मुंबई इंडिअन्सच्या टीममध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं समजलं जात आहे. हा व्हिडीओ नंतर केकेआरच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून हटवण्यात आला. मात्र तोपर्यंत अनेक युजर्सनी तो व्हिडीओ डाऊनलोड केला होता.

या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा अभिषेक नायरसोबत बोलताना दिसत आहे. त्यात तो म्हणतो, “एक एक गोष्ट बदलत आहे. ते त्यांच्यावर आहे. ते माझं घर आहे. ते जे मंदिर आहेत ते मी बनवलंय!” रोहितचा हा संवाद इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला. त्यामुळे चाहत्यांनी मुंबई इंडिअन्सच्या मॅनेजमेंटवर प्रचंड प्रमाणात टीका करायला सुरुवात केली. त्यानंतर केकेआरच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून तो व्हिडीओ डिलीट करण्यात आला. तसेच, लखनौ विरुद्ध झालेल्या सामन्याआधी रोहित शर्मा धवल कुल्कर्णीसोबत हास्यविनोद करत होता. यावेळी तिथे कॅमेरामन चित्रीकरण करण्यास आला असता रोहित त्याला हात जोडत म्हणाला. “भावा ऑडिओ बंद कर यार… एका ऑडिओने पहिल्यांदा माझी वाट लावलीय!” यामुळे मुंबईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असले तरी मुंबईच्या मॅनेजमेंटमध्ये काहि आलबेल नसल्याचे दिसतंय.

 
 
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss