T20 WC 2022 : टीम इंडियाला सेमीफायनलआधी मोठा धक्का, सराव दरम्यान ‘या’ खेळाडूच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत

T20 WC 2022 : टीम इंडियाला सेमीफायनलआधी मोठा धक्का, सराव दरम्यान ‘या’ खेळाडूच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत

विश्वचषक स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये चार टीम पोहोचल्या आहेत. त्यामध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझिलंड या टीमचा समावेश आहे.९ नोव्हेंबरला पाकिस्त्नान आणि न्यूझिलंड यांच्यात मॅच होणार आहे. तर १० नोव्हेंबरला टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात मॅच होणार आहे. सध्या टीम इंडिया एडिलेड या मैदानात सराव करीत आहे. तिथं टीम इंडियाची न्यूझिलंडविरुद्ध मॅच होणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सराव करीत असताना जखमी झाला आहे.

हेही वाचा : 

अशा विधानांमुळे ‘देवेंद्र फडणवीस’ यांचं नाव खराब होत ; ठाकरेंनी उपमुखमंत्र्यांना केलं लक्ष

रोहित शर्माला इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी नेटमध्ये फलंदाजी करताना मनगटाची दुखापत झाली होती. कर्णधार रोहित शर्माच्या उजव्या हाताच्या मनगटावर दुखापत झाली. मात्र, आता रोहित शर्माने पुन्हा सराव सुरू केला आहे. कर्णधार रोहित शर्माची दुखापत किती गंभीर आहे, याचा अंदाज बांधता येणार नाही. पण रोहित शर्माची दुखापत गंभीर झाल्यास इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसू शकतो. भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठीही ही निराशाजनक बाब असेल.

रोहितच्या डाव्या हाताला दुखापत झाली. त्यावेळी तिथं अन्य खेळाडूही उपस्थित असल्याचं व्हिडीओतून स्पष्ट दिसत आहे. तसेच हाताला जखम झाल्यानंतर रोहित सराव थांबवून एका बाजूला बसल्याचं दिसत आहे.ज्यावेळी रोहित शर्माला जखम झाली. त्यावेळी रोहितने काहीवेळ विश्रांती घेतली. काहीवेळानंतर तिथं नेटमध्ये रोहितने काही चेंडू खेळल्याची माहिती मिळाली आहे. पुढच्या सामन्यात खेळण्यासाठी रोहित फीट आहे का ? याची सुद्धा चाचणी घेतली जाईल. समजा रोहित शर्माची जखम गंभीर असेल तर टीम इंडियासाठी हा मोठा धक्का असेल.

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल, असा असेल राहुल गांधींचा आजचा कार्यक्रम

१० नोव्हेंबरला सेमीफायनल

टीम इंडिया १० नोव्हेंबरला दुपारी १.३० वाजता इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. हा सामना अॅडलेड ओव्हलवरच होणार आहे. या जुलैमध्ये टीम इंडियाने याच भूमीवर टी-२० मालिकेत इंग्लंडला पराभूत केले होते, अशा परिस्थितीत या सामन्यात त्यांचे पारडे जड दिसते.

हर हर महादेव चित्रपटाच्या शो बंद करण्यावरून ठाण्यातील विवियाना मॉल राडा, जितेंद्र आव्हाडांच्या १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Exit mobile version