IND vs ENG Semi Final : रोहित शर्मा उपांत्य फेरीत खेळणार नाही? कालच्या दुखापतीवर महत्वाचे अपडेट्स आले समोर

IND vs ENG Semi Final : रोहित शर्मा उपांत्य फेरीत खेळणार नाही? कालच्या दुखापतीवर महत्वाचे अपडेट्स आले समोर

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ T-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा १५ वर्षांचा खंड संपवणार अशी अपेक्षा आहे. भारतीय संघासमोर उपांत्य फेरीत इंग्लंडचे आव्हान आहे आणि हा संघ डेंजर असल्याचे मत रोहितने आधीच व्यक्त केले होते. पण, इंग्लंडचा सामना करण्यापूर्वी भारतीय संघाची धाकधुक वाढवणारी घटना मंगळवारी घडली. नेट मध्ये सराव करताना रोहितच्या हातावर वेगाने चेंडू आदळला आणि त्याला दुखापत झाली. त्यामुळे तो उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळणार की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. थ्रो डाऊन स्पेशलिस्ट रघूचा चेंडू रोहित शर्माच्या हाताला लागला, त्यानंतर त्याला खूप दुखत होता, मात्र त्यानंतर त्याने पुन्हा सराव सुरू केला. आता रोहित शर्माने त्याच्या दुखापतीबाबत अपडेट दिले आहे.

रोहित शर्मा म्हणाला, ‘मंगळवारी मला चेंडूचा फटका बसला होता, पण आता मला ठीक वाटत आहे. हातावर थोडीशी खूण होती पण आता ती पूर्णपणे ठीक आहे. याशिवाय रोहित शर्माने दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंतच्या मुद्द्यावरही मोठी खेळी केली. प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण खेळणार हे त्याने स्पष्ट केले नाही.

हेही वाचा : 

Earthquake : दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यं भूकंपाने हादरली, नेपाळमध्ये मृत्यू

रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांच्या निवडीच्या मुद्द्यावर रोहित शर्मा म्हणाले की, हे दोघेही समीकरणातच राहतील. रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण खेळणार हे स्पष्टपणे सांगितले नाही. तसे, मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिकपेक्षा ऋषभ पंतला प्राधान्य मिळू शकते. कार्तिक या स्पर्धेत अपयशी ठरत असून डावखुरा फलंदाज म्हणून ऋषभ पंतचे पारडे जड वाटते.

इंग्लंड मजबूत प्रतिस्पर्धी – रोहित

रोहित शर्माने इंग्लंडचा मजबूत प्रतिस्पर्धी असल्याचे वर्णन केले. त्याच्या मते इंग्लंडचा संघ धोकादायक असून ते कोणालाही पराभूत करू शकतात. त्याचवेळी रोहित शर्मा म्हणाला, ‘नॉकआऊट सामन्यांमध्ये कामगिरी करणं महत्त्वाचं असतं पण ते तुमच्या करिअरबद्दल सगळं काही सांगत नाही. एका खराब नॉक-आउट सामन्याने एखाद्या खेळाडूची संपूर्ण कारकीर्द खराब आहे असे तुम्ही सांगू शकत नाही.

Justice DY Chandrachud : न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड देशाचे ५० वे सरन्यायाधीश, ४४ वर्षानंतर वडिलांची जबाबदारी पुत्रावर

भारतीय फलंदाजांना ‘डरपोक’ संबोधले

इंग्लंडचा माजी खेळाडू हुसेन याने ‘द डेली मेल’साठी एक कॉलम लिहिला आहे. त्यामध्ये रवी शास्त्री यांनी काहीतरी बदल करायला पाहिजे असं लिहिलं आहे. सध्या टीम इंडियामध्ये अनेक खेळाडू असे आहेत, की त्यांनी चुकीच्या पद्धतीने क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना हुसैन डरपोक म्हणाला आहे. विशेष म्हणजे विराट कोहली, सुर्यकुमार यादव या दोन चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंची तारिफ केली आहे. तसेच दिनेश कार्तिकच्या जागेवर ऋषभ पंतला संधी द्यावी असंही हुसैन यांनी त्या लेखात म्हटलं आहे.

Mumbai Local Train : अंधेरी आणि जोगेश्वरी दरम्यान तांत्रिक बिघाड असल्याने, पश्चिम रेल्वेची विस्कळी

Exit mobile version