रोहितच्या हातून कर्णधारपद जाणार, हार्दिक पांड्या होणार भारतीय संघाचा नवा कर्णधार?

अष्टपैलू हार्दिक पंड्याने उपांत्य फेरीच्या सामन्यात तुफानी खेळी केली. त्याने ३३ चेंडूत ५ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ६३ धावा केल्या.

रोहितच्या हातून कर्णधारपद जाणार, हार्दिक पांड्या होणार भारतीय संघाचा नवा कर्णधार?

टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये भारत उपांत्य फेरीत खेळला आणि इंग्लंडकडून वाईट रीतीने पराभूत झाल्यानंतर बाहेर पडला. उपांत्य फेरीत पोहोचल्यामुळे भारतीय चाहत्यांना संघाकडून खूप अपेक्षा होत्या. उपांत्य फेरीच्या सामन्यात गोलंदाजांनी चाहत्यांची बरीच निराशा केली. कारण भारतीय गोलंदाजी कॅम्पला इंग्लंडची एकही विकेट काढता आली नाही. पण संपूर्ण स्पर्धेवर नजर टाकली तर अनेक जण यासाठी जबाबदार ठरताना दिसतात. यामुळे सध्याचा कर्णधार रोहित शर्माच्या कर्णधारपदावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

खरं तर यावेळी अष्टपैलू हार्दिक पंड्याने उपांत्य फेरीच्या सामन्यात तुफानी खेळी केली. त्याने ३३ चेंडूत ५ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ६३ धावा केल्या. पांड्याची फलंदाजी पाहण्यासारखी होती. याशिवाय त्याने विश्वचषक स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्धही चांगली फलंदाजी केली होती. विराट कोहली सामन्याचा हिरो असला तरी हार्दिक पांड्यानेही त्याला चांगली साथ दिली. एवढेच नाही तर हार्दिक पांड्याने गोलंदाजीतही चांगले योगदान दिले आहे. यामुळेच आता रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी जोर धरू लागली असून चाहत्यांना कर्णधारपदी पांड्याला पाहायचे आहे.

हार्दिक पांड्याने आयपीएल २०२२ मध्ये उत्कृष्टपणे कर्णधारपद सांभाळले. आयपीएल २०२२ मध्ये १० संघ सहभागी झाले होते. यापूर्वी या विजेतेपदासाठी ८ संघ लढत असत. गुजरात आणि लखनौ २ नवीन संघांचा समावेश करण्यात आला. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्याने मुंबई सोडून गुजरातचे कर्णधारपद स्वीकारले आणि संघाला पहिले विजेतेपदही मिळवून दिले.

रोहित शर्माबद्दल बोलायचे झाले तर तो आशिया चषक ते टी-२० विश्वचषकापर्यंत आपल्या फलंदाजीची जादू दाखवू शकला नाही. त्यामुळेच त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इतकेच नाही तर भारतीय निवड समितीचे माजी अध्यक्ष के श्रीकांतसुद्धा या प्रकरणावर बरेच काही बोलले आहेत. पुढील टी-२० विश्वचषकापूर्वी पांड्याला टी-२० संघाचा नियमित कर्णधार बनवायला हवे, असेही ते म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

MS Dhoni: धोनी आयपीएलला अलविदा करून टीम इंडियावर लक्ष केंद्रित करेल..?

Kieron Pollard : मुंबई इंडियन्सचा लाडका खेळाडू किरॉन पोलार्ड निवृत्त, भावुक पोस्ट केली शेअर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version