spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

RRvsLSG, राजस्थान रॉयल्सचा विजयरथ लखनौ सुपर जायंट्स रोखणार का?

आयपीएल २०२३ च्या (IPL 2023) यंदाच्या सीझनमधील दोन अव्वल संघ आज जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये (Man Singh Stadium) आजचा सामना खेळवला जाणार आहे.

आयपीएल २०२३ च्या (IPL 2023) यंदाच्या सीझनमधील दोन अव्वल संघ आज जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये (Man Singh Stadium) आजचा सामना खेळवला जाणार आहे. पहिल्या स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि दुसऱ्या स्थानावरील लखनौ सुपर जायंटस्‌ (Lucknow Super Giants) हे दोन्ही संघ आज आमनेसामने असणार आहेत. या वेळी लखनौ सुपर जायंटस्‌चा संघ या लढतीत राजस्थान रॉयल्स सलग तीन सामान्यांमधील विजयी रथ रोखणार आहे का? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. के. एल. राहुलच्या (K. L. Rahul) नेतृत्वात लखनौ जायंट्सचा संघ आज राजस्थान रॉयल्सच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरणार आहे. आयपीएलमध्ये लखनौ जायंट्सचा संघ चढ उतारामधून जात आहे. तीन लढतीमध्ये त्यांनी विजय मिळवला असून दोन लढतीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

लखनौ सुपर जायंटस्‌ कडे अव्वल दर्जाचे फलंदाज आहे. लखनौचा कर्णधार राहुलने पंजाब किंग्सविरुद्धच्या लढतीत ७४ धावांची खेळी केली. ही लढत लखनौच्या संघाचा पराभूत झाला पण राहुलने या सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. लखनौसाठी ही आनंदाची बाब आहे. काईल मेयर्स, निकोलस पुरन, मार्कस स्टॉयनीस या परदेशी फलंदाजांमध्ये एकाहाती सामना फिरवण्याची कुवत आहे. लखनौचा दीपक हूडाचा फलंदाजीचा फॉर्म हा संघासाठी चिंतेचा विषय आहे.

राजस्थान रॉयल्सच्या संघामध्ये एकापेक्षा एक असे शानदार फलंदाज आहेत. जॉस बटलर (२०४ धावा), शिमरॉन हेटमायर (१८३ धावा), संजू सॅमसन (१५७ धावा), यशस्वी जयस्वाल (१३६ धावा) यांच्याकडून या सीझनमध्ये आतापर्यंत शानदार फलंदाजी झाली आहे. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांसमोर राजस्थानच्या फलंदाजांसाठी तागडे आव्हान असणार आहे. देवदत्त पडिकलने अद्याप म्हणावी तशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. राजस्थानच्या गोलंदाजांनीही प्रभावी कामगिरी केली आहे. राजस्थान संघातील युझवेंद्र चहल ११ विकेट, रवीचंद्रन अश्‍विन ६ विकेट, ट्रेंट बोल्ट ६ विकेट, संदीप शर्मा ४ विकेट या गोलंदाजाच्या कामगिरीमुळे राजस्थानला पाचपैकी चार सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे.

हे ही वाचा : 

सहा वर्षात उत्तर प्रदेशमध्ये झालेत १०,७१५ एन्काऊंटर, योगींच्या कार्यशैलीने उत्तर प्रदेश ठरतोय उत्तम प्रदेश

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआयकडून चौकशी

अग्निशमन सेवा सप्ताहास आरंभ, आयुक्त अभिजीत बांगर यांनी वाहिली शहिदांना श्रद्धांजली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss