RRvsPBKS, दुसऱ्या विजयाची गुढी कोणता संघ उभारणार? राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स

आयपीएलच्या (IPL) मागील सिझनमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) यंदाच्या सिझनची सुरुवात विजयाने केली आहे. आज गुवाहाटी येथे होणाऱ्या लढतीत त्यांना पंजाब किंग्सचा (Punjab Kings) सामना करावा लागणार आहे.

RRvsPBKS, दुसऱ्या विजयाची गुढी कोणता संघ उभारणार? राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स

आयपीएलच्या (IPL) मागील सिझनमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) यंदाच्या सिझनची सुरुवात विजयाने केली आहे. आज गुवाहाटी येथे होणाऱ्या लढतीत त्यांना पंजाब किंग्सचा (Punjab Kings) सामना करावा लागणार आहे. गुवाहाटी हे राजस्थान रॉयल्सचे घरचे मैदान असणार आहे. या सीझनमधील पहिलाच सामना या मैदानावर होत आहे. राजस्थानच्या दोन लढती येथे होणार असून यामधली पहिली लढत पंजाबच्या संघाशी होणार आहे आणि दुसरी लढत दिल्ली कॅपिटल्स सोबत ८ एप्रिलला होणार आहे. राजस्थानच्या संघाने पहिल्याच सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादचा ७२ धावांनी पराभव केला. या सामन्यांमध्ये यशस्वी जयस्वाल (५४ धावा), जॉस बटलर (५४ धावा), संजू सॅमसन (५५ धावा) यांनी धडाकेबाज फलंदाजी करीत प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले.

देवदत्त पडिक्कल आणि रियान पराग या फलंदाजांना मधल्या फळीत अपयश आले परंतु शिमरोन हेटमायर याने अखेरच्या षटकात दे दणादण फटकेबाजी करीत राजस्थानला २०३ ही धावसंख्या गाठून दिली. राजस्थान रॉयलची गोलंदाजी सुद्धा भक्कम आहे. भारतीय संघातील दोन अव्वल दर्जाचे फिरकी गोलंदाज या संघामध्ये आहेत. रवीचंद्रन अश्‍विन व युझवेंद्र चहल यांच्या समावेशामुळे राजस्थानचा गोलंदाजी भक्कम झाली आहे. पहिल्या सामन्यांमध्ये चहलने चार आणि अश्विनने एक फलंदाज बाद केला होता. या दोघांच्या दिमतीला ट्रेंट बोल्टच्या रुपात अनुभवी वेगवान गोलंदाजही राजस्थानच्या संघात आहे. बोल्ट यानेही दोन फलंदाज बाद करून पहिल्याच विजयात चमक दाखवली. या तिघांसह के. सी. करियप्पा, कुलदीप सेन, नवदीप सैनी, मुरुगन अश्‍विन, ओबेड मॅकॉय, के. आसिफ हे गोलंदाजही संघात आहेत.

पंजाब किंग्सने सलामीच्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्स संघावर डकवर्थ लुईस नियमानुसार ७ धावांनी विजय मिळवला. राजस्थानाने मिळवलेल्या विजयासारखा हा एकतर्फी विजय नव्हता परंतु दोन गुण महत्त्वाचे होते. या सामन्यांमध्ये कर्णधार शिखर धवन, भानुका भनुका राजपक्षा यांनी फलंदाजीत, तर अर्शदीप सिंग याने गोलंदाजीत जबरदस्त कामगिरी केली. धवन आणि दोन भारतीयांकडून पंजाबला मोठ्या अपेक्षा आहेत. असेच सॅम करण या इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूच्या कामगिरीवरही संघाला अवलंबून रहावे लागणार आहे.इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून लियाम लिव्हिंगस्टोन याला तंदुरुस्तीचे सर्टिफिकेट देण्यात आले नाही. त्यामुळे तोही पहिल्या लढतीला मुकला. उद्याच्या लढतीत या दोघांचा पंजाबचा संघात समावेश झाल्यास त्यांच्यासाठी ही चांगली बाब ठरणार आहे.

हे ही वाचा : 

IPL2023, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर

IPL 2023 DC Vs GT, आज येणार दिल्ली आणि गुजरात आमने सामने, पांड्या विजयाचा पॅटर्न कायम ठेवणार?

IPL2023, आज IPL २०२३ मध्ये डबल धमाका, धुव्वाधार संडे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version