spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या आधी सचिन तेंडुलकरचे झाले कानपूरमध्ये जबरदस्त स्वागत

मास्टर ब्लास्टर २०२१ मध्ये स्पर्धेतील तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून उदयास आला होता.

भारतीय क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. मास्टर ब्लास्टर रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०२२च्या दुसर्‍या आवृत्तीत गतविजेत्या इंडिया लिजेंड्सचे नेतृत्व करेल . शनिवारी दक्षिण आफ्रिका लिजेंड्स विरुद्ध सीझन ओपनरच्या आधी, या महान फलंदाजाचे कानपूरमधील हॉटेलमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले.

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या अधिकृत ट्विटर हँडलने सचिनच्या आगमनाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी सचिन केवळ इंडिया लिजेंड्स संघाचे नेतृत्व करणार नाही तर तो स्पर्धेचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणूनही दिसणार आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजने त्याच्या आगमनाचा व्हिडिओ शेअर करत त्याला, “आमचा ब्रँड अॅम्बेसेडर आणि इंडिया लीजेंड्सचा कर्णधार सचिन तेंडुलकर कानपूर, भारत येथे उतरल्यानंतर.”, असे कॅप्शन दिले आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू जसे- हरभजन सिंग, युवराज सिंग, इरफान पठाण आणि इतर अनेक सचिनच्या नेतृत्वाखाली इंडिया लीजेंड्ससाठी खेळतील.

सचिनने मागच्या वर्षी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या उद्घाटनाच्या आवृत्तीत इंडिया लीजेंड्सला मदत केली होती. मास्टर ब्लास्टर २०२१ मध्ये स्पर्धेतील तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून उदयास आला होता. सचिनने सात सामने खेळले आणि ३८. ८३ च्या सरासरीने २३३ धावा केल्या. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या उद्घाटनाच्या आवृत्तीतही त्याने दोन अर्धशतके झळकावली. अंतिम सामन्यात सचिनने २३ चेंडूत ५ चौकार लगावत ३० धावा केल्या. अखेरीस इंडिया लिजेंड्सने चार गडी गमावून १८१ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेच्या दिग्गज संघाला केवळ १६७/७ पर्यंतच मजल मारता आली.

इंडिया लिजेंड्स आता शनिवारी कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका लीजेंड्सविरुद्धच्या सामन्याने जेतेपदाच्या बचावाची सुरुवात करेल. या दोन संघांसोबतच ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि बांगलादेशचे दिग्गज संघही रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या दुसऱ्या सत्रात भाग घेतील.

हे ही वाचा:

पितृपक्षात श्राद्ध का करावे, श्राद्ध करण्याची पद्धत काय ?… पितृपक्षाबद्दल सर्व माहिती घ्या जाणून

प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार; बिग बॉस मराठीचा ४था सीजन लवकरच सुरु होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss