मुंबईकरांना सॅल्यूट…! मुंगी घुसायलाही जागा नसताना रुग्णवाहिकेला दिली अशी मोकळी वाट करून

टीम इंडिया टी20 वर्ल्डकप जेतेपद मिळवून मुंबईत दाखल झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून क्रीडाप्रेमी आपल्या लाडक्या टीम इंडियाची वाट पाहात होते. अखेर टीम इंडियाचे विजयी शिलेदार मुंबई दाखल झाले आहेत.

मुंबईकरांना सॅल्यूट…! मुंगी घुसायलाही जागा नसताना रुग्णवाहिकेला दिली अशी मोकळी वाट करून

टीम इंडिया टी20 वर्ल्डकप जेतेपद मिळवून मुंबईत दाखल झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून क्रीडाप्रेमी आपल्या लाडक्या टीम इंडियाची वाट पाहात होते. अखेर टीम इंडियाचे विजयी शिलेदार मुंबई दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली. तासंतास टीम इंडियाची एक झलक पाहण्यासाठी चाहते उभे होते. अगदी मुंगी सुद्धा जाणार नाही इतकी गर्दी सध्या दक्षिण मुंबईमध्ये दिसून येत आहे. परंतु याच गर्दीतून मुंबईरानी रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली आहे.

ज्या गर्दीत मुंगी शिरायलाही जागा नव्हती अशा गर्दीतून चाहत्यांनी रुग्णवाहिकेला मोकळी वाट करून दिली. इतक्या गर्दितून अवघ्या काही सेकंदात रुग्णवाहिका निघून गेली. टीम इंडियाच्या विजयी रॅली घेऊन निघालेल्या बसला जिथे काही तासांचा अवधी लागला. जस जशी रुग्णवाहीका पुढे जात होती तस तसं मोकळी वाट मिळत होती. तिथे फक्त १७ सेकंदात रुग्णवाहीका निघून गेली. हे दृश्य पाहून अनेकांनी मुंबईकरांच्या कृतीचं कौतुक केलं आहे. अनेकांनी हा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. मुंबईकर कायमच सुख दुखात एकमेकांच्या साथीला उभे राहतात. एखादी मोठी आपत्ती आली की तितक्याच ताकदीने उभे राहतात. अनेकांनी या व्हिडीओखाली कमेंट्स करत मुंबईकरांची स्तुती केली आहे.

मरीन ड्राईव्हचे हवाई दृश्य पाहून लाखोंच्या गर्दीतून रुग्णवाहिका पुढे सरकत असल्याचे दिसून येते . आपल्या आवडत्या खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी लोक जल्लोष करत आहेत. आणि त्याचवेळी माणुसकी दाखवत रुग्णवाहिकेला आरामात रस्ताही देत ​​आहेत. एवढ्या मोठ्या जनसमुदायामधून क्रीडाप्रेमींनी मानवतेची ओळख करून दिली. क्रीडाप्रेमींच्या प्रेम, उत्साह आणि सेवा आणि सहकार्याच्या भावनेने मरीन ड्राइव्हवर एक अनोखा देखावा निर्माण झाला.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version