शुभम गिलच्या पाठोपाठ विराट कोहलीने ठोकले शतक

शुभम गिलच्या पाठोपाठ विराट कोहलीने ठोकले शतक

विराट कोहलीच्या (Virat Kohli) जबरदस्त खेळीने टीम इंडियाला रविवारी तिरुअनंतपुरममधील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर (Greenfield International Stadium) तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे (Last ODI) सामन्यात श्रीलंकेविरुद्ध ३९०/५ अशी मजल मारली. कोहलीने त्याचे ४६ वे एकदिवसीय शतक पूर्ण केले आणि ११० चेंडूत १६६* धावांवर नाबाद राहिला. त्याच्या व्यतिरिक्त शुभमन गिलनेही (Shubman Gill) आपले दुसरे वनडे शतक झळकावले आणि ९७ चेंडूत ११६ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मानेही ४९ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून लाहिरू कुमारा आणि कसून राजिताने प्रत्येकी दोन तर चमिका करुणारत्नेने एक विकेट घेतली. विराट कोहली विरुद्ध श्रीलंका यांच्यातील हा ५० वा एकदिवसीय सामना आहे. पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करावा लागलेला श्रीलंकेचा संघ अभिमान वाचवण्याचा प्रयत्न करेल.

सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी (Batting first) करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या एकदिवसीय सामन्याप्रमाणे एक मोठी धावसंख्या करुन श्रीलंकेवर प्रेशर आणण्याचा भारताचा डाव होता. जो सत्यात आणण्यातही भारताला यश आलं. कर्णधार रोहित (Captain Rohit) आणि शुभमन यांनी आधी उत्तम सुरुवात करुन दिली. पण रोहित ४६ धावा करुन बाद झाला. ज्यानंतर कोहलीने गिलसोबत डाव सावरला. इकडे गिलने शतक तर कोहलीनं अर्धशतक पूर्ण केलं ज्यानंतर काही वेळात ११६ धावांवर गिल तंबूत परतला. त्याने ९७ चेंडूत १४ चौकार आणि २ षटकार ठोकत ११६ धावा केल्या.

श्रेयसने कोहलीची साथ दिली. कोहलीही तुफान फटकेबाजी करु लागला आणि ८५ चेंडूत त्याने शतक पूर्ण करत ७४ वं आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केलं. ज्यानंतरही त्यानं थांबायचं नाव घेतलं नाही अखेरच्या बॉलपर्यंत कोहली धावा ठोकत होता. त्याने ११० चेंडूत १३ चौकार आणि ८ षटकार ठोकत नाबाद १६६ धावा केल्या. कोहली आणि गिलशिवाय इतर फलंदाज खास कामगिरी करु शकले नाहीत. अय्यरने 38 धावांचं योगदान दिलं.

हे ही वाचा:

Collage Festival, ‘अंतरंग’ फेस्टिवलमध्ये रंगले कीर्ती कॉलेजचे विद्यार्थी

Nepal Yeti Airlines Plane Crash, लँडिंगच्या अवघ्या १० सेकंदापूर्वीच प्लेन झाले क्रॅश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version