शुभम गिलचे शतक तर विराट कोहलीने ठोकले अर्धशतक

शुभम गिलचे शतक तर विराट कोहलीने ठोकले अर्धशतक

शुभमन गिलने (Shubman Gill) ८९ चेंडूत आपले दुसरे वनडे शतक (century) पूर्ण केले आहे. दुसरीकडे, विराट कोहलीनेही (Virat Kohli) ४८ चेंडूत अर्धशतक झळकावले. तत्पूर्वी, आज तिरुअनंतपुरम (Thiruvananthapuram) येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Greenfield International Stadium) भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Captain Rohit Sharma) श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक (coin toss) जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघामध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya)आणि उमरान मलिक (Umran Malik) यांना विश्रांती दिली आहे, तर सूर्यकुमार यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांना सामन्यासाठी स्थान देण्यात आले आहे. विराट कोहली विरुद्ध श्रीलंका यांच्यातील हा ५० वा एकदिवसीय सामना आहे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (क), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (w), सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): अविष्का फर्नांडो, नुवानिडू फर्नांडो, कुसल मेंडिस (प.), अशेन बंडारा, चरिथ असालंका, दासुन शानाका (क), वानिंदू हसरंगा, जेफ्री वेंडरसे, चमिका करुणारत्ने, कसून राजिथा, लाहिरू कुमारा

पहिल्या वनडे मॅचमध्ये विराट कोहलीने शानदार शतक झळकावलं. कॅप्टन रोहित शर्मा आणि शुभमन गिलने अर्धशतकं फटकावली. कोलकाता येथील दुसऱ्या वनडे सामन्यात मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादवने गोलंदाजीत कमाल केली. कुलदीपने तीन विकेट काढल्या. त्यामुळे त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. दुसऱ्या वनडेत भारतीय फलंदाज फ्लॉप ठरले होते. केएल राहुलने झुंजार अर्धशतक झळकावल. त्यामुळे टीम इंडियाने ४ विकेटने सामना जिंकला.

हे ही वाचा:

Tata Mumbai Marathon, दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुंबईकरांनी घेतली मोठी धाव

कोण आहेत खाशाबा दादासाहेब जाधव? ज्यांच्यासाठी गूगलने शेअर केलंय खास डूडल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version