spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

SL vs NZ Test Match : आता पाच नाही तर सहा दिवस चालणार कसोटी सामना; काय आहे यामागचं कारण ?

SL vs NZ Test Match : क्रिकेटच्या कसोटी सामन्यांना सुरुवात झाली आहे. त्याचमुळे न्यूझीलंडचा संघ कसोटी सामन्यासाठी श्रीलंका दौऱ्यावर आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंड (Sri Lanka vs New Zealand) या संघांमध्ये दोन कसोटी मालिका खेळल्या जाणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना गॅले आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झाला असून श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिला कसोटी सामना हा १८ सप्टेंबरला सुरु झाला.

पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी श्रीलंकेने २०२ धावांची आघाडी करत यजमान पद भूषवलं होतं. परंतु चौथ्या दिवशी हा सामना खेळला गेला नाही. सामना होऊ शकत नाही अशी कोणतीही परिस्थिती नसताना सुद्धा हा सामना खेळवला गेला नाही. २१ सप्टेंबरला रेस्ट डे घोषित करण्यात आला. पहिला सामना १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर यादिवसांमध्ये होणार होता पण आता हा सामना २३ सप्टेंबरपर्यंत खेळला जाईल.

काय आहे कारण ?
मालिकेचं वेळापत्रक जाहीर करताना श्रीलंका क्रिकेट बोर्डाने प्रेस रिलीजमध्ये याबद्दल अधिकृतपणे माहिती दिली होती. या प्रेस रिलिजमध्ये लिहिलं होत की, पहिल्या कसोटीचा चौथा दिवस हा रेस्ट डे दिला जाणार आहे. कारण श्रीलंकेत राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार असून खेळाडू आपापल्या मतदार संघात जाऊन मतदान करणार आहेत. त्यामुळे यादिवशी खेळ होणार नाही. या कारणामुळे हा कसोटी सामना २२ सप्टेंबर ऐवजी २३ सप्टेंबरपर्यंत खेळला जाणार आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सहा दिवस सामना होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी २००१ साली कोलंबो येथे झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेने सहा दिवस कसोटी सामना खेळला होता. त्यावर्षी पोया दिवस ( Full Moon Day) साजरा करण्यासाठी सामना थांबवण्यात आला होता. पहिला कसोटी सामना हा १८ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर असा होईल. त्याचसोबत दुसरा कसोटी सामना २६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या दिवसांमध्ये खेळवला जाणार आहे.

हे ही वाचा:

लोकशाही आणि लोकशक्तीला घाबरणारे हे डरपोक सरकार, मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकांवरून Sanjay Raut यांचा महायुती सरकारवर निशाणा

Raj Thackeray Vision Worli: Sandeep Deshpande हा राजकीयदृष्ट्या जागृत आणि अभ्यासू मुलगा, तो आमचा हिरा! ठाकरेंकडून देशपांडेंचे कौतुक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss