spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

SRHvsLSG, सनरायजर्स हैदराबादचा संघ पहिला विजय मिळवणार का? लखनौ सुपर जायंट्स पडणार भारी

आयपीएल २०२३ मध्ये (IPL 2023) ७ एप्रिल रोजी दहावा सामना लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यामध्ये होणार आहे.

आयपीएल २०२३ मध्ये (IPL 2023) ७ एप्रिल रोजी दहावा सामना लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यामध्ये होणार आहे. लखनौच्या इकाना स्टेडिअमवर (Ekana Stadium) शक्रवारी ७.३० वाजता हा सामना रंगणार आहे. यंदाच्या सीझनमधील लखनौच्या संघचा हा तिसरा सामना खेळणार आहे आणि हैदराबादचा संघ हा दुसरा सामना खेळणार आहे. दोन्ही संघाच्या विजयाच्या आशेने मैदानावर उतरणार आहेत.

हैदराबादच्या संघाने या मैदानावर एक सामना खेळाला आहे त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे दोन सामने खेळलेल्या लखनौ सुपर जायंट्स च्या संघाने एका सामना जिंकला आहे तर दुसऱ्या सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागणार आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये आयपीएलमध्ये याआधी एकच सामना झाला आहे त्यामध्ये लखनौ सुपर जायंट्सचा संघ विजयी झाला आहे.

त्या सामन्यांमध्ये लखनौच्या संघाने १६९ धावांचे लक्ष दिले होते. मात्र हैदराबादच्या संघाला १५७ धावांच करता आल्या. या सीझनमध्ये लखनौने दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) विरोधामध्ये पहिला सामना ५० धावांनी जिंकला. त्यांनतर दुसरा सामना चेन्नई सुपर किंगच्या विरोधात खेळला त्या सामन्यांमध्ये चेन्नईने लखनौच्या १२ धावांनी सामना जिंकला होता. हैदराबादच्या संघाला अद्यापही खातं उघडता आले नाही. हैदराबाद संघाचा राजस्थान रॉयलच्या विरोधामध्ये पहिल्या सामन्यात पराभव झाला. या सामन्यांमध्ये राजस्थानने हैदराबाद संघाचा ७२ धावांनी पराभव केला आहे.

हे ही वाचा : 

नवनीत राणांच्या टीकेवर मनीषा कायंदे यांचे प्रत्युत्तर…

जागतिक आरोग्य संघटनेचा ७५ वा जागतिक आरोग्य दिन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह खासदार,आमदारांचा ९ एप्रिलला अयोध्या दौरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss