spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

SL vs UAE: श्रीलंकेने T२० विश्वचषक २०२२ च्या सहाव्या सामन्यात UAE चा ७९ धावांनी पराभव केला

श्रीलंकेने T२० विश्वचषक २०२२ च्या सहाव्या सामन्यात UAE चा ७९ धावांनी पराभव केला. या सामन्यात श्रीलंकेसाठी दुष्मंथा चमीराने शानदार गोलंदाजी केली. चामिराने घातक गोलंदाजीच्या जोरावर विकेट्सचे अर्धशतकही पूर्ण केले. T२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५० पेक्षा जास्त बळी घेणारा तो श्रीलंकेचा पाचवा गोलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत ५२ विकेट घेतल्या आहेत.

Ultraviolette F77 Electric Bike : अल्ट्राव्हायोलेट F77 न्यू इलेक्ट्रिक बाईक, या महिन्यात होणार लॉन्च

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने १५२ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात यूएईचा संघ ७३ धावांवर गारद झाला. यादरम्यान चमीराने ३.५ षटकात केवळ १५ धावा देत ३ बाद केलं. त्याने तीन विकेट घेताच ५० चा टप्पा ओलांडला आणि विक्रम केला. त्याने महंमद वसीम, आर्यन लाक्रा आणि कर्णधार रिझवानला बाद केले.

हेही वाचा : 

पुण्यात पुन्हा जोरदार पावसाळा सुरवात; हवामान विभागाने म्हटले…

लसिथ मलिंगाच्या नावावर श्रीलंकेसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने संघासाठी १०७ विकेट्स घेतल्या आहेत. या प्रकरणात वणींदू हसरंगा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ७५ विकेट घेतल्या आहेत. अजंता मेंडिस ६६ विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. नुवान कुलसेकरानेही ६६ विकेट घेतल्या आहेत. दुष्मंथा चमिरा चौथ्या स्थानावर आहे.

वानिंदू हसरंगाने यूएईविरुद्ध अधिक प्रभावी गोलंदाजी केली हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्याने ४ षटकात केवळ ८ धावा देत ३ बळी घेतले. त्याने १ मेडन ओव्हरही काढले. महिषा टेकशाने ३.१ षटकात १५ धावांत २ बळी घेतले. कर्णधार दासुन शनाकाने १.१ षटकात ७ धावा देत एक बाद केला. प्रमोद मधुशनलाही एक विकेट मिळाली.

भास्करशेठ तुम्ही आधी आणि आताही नाच्या’चं चांगल काम करता, तेच करा; चित्र वाघ

Latest Posts

Don't Miss