श्रीलंके विरुद्ध पाकिस्तान, आशिया टी-२० सामान्यचा अंतिम मुकाबला

श्रीलंके विरुद्ध पाकिस्तान, आशिया टी-२० सामान्यचा अंतिम मुकाबला

सर्वांचं लक्ष आणि उत्सुकता लागली होती कि कोणता संघ आशिया कपच्या अंतिम सामन्यात पोचणार आणि कोणता संघ विजयी होणार ती उत्सुकता आता लवकरच संपणार आहे. कारण आज श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान (SL vs PAK) आशिया चषक अंतिम सामना रविवार, ११ सप्टेंबर रोजी संयुक्त अरब यूएई येथे होणार आहे. श्रीलंकाची परिस्तिथी जर बघितली तर खूप बिकट आहे, तरी सुद्धा श्रीलंका संघाने आपली चांगली कामगिरी दाखवत अंतिम सामन्यात पोहोचली आहे. श्रीलंका या आशिया चषकाचे यजमान आहेत परंतु याला नशिबाचा क्रूर वळण म्हणा, सुरक्षेच्या कारणास्तव ही स्पर्धा यूएईला हलवावी लागली. विजयाचा मुकुट कोणाच्या डोक्यावर जाणार हे पाहण्यासाठी सगळे क्रिकेट प्रेमी उत्सुक आहेत.

SIIMA पुरस्कार २०२२: टॉलीवुड विजेत्यांची संपूर्ण यादी पहा…

आशिया टी २० क्रिकेट स्पर्धे मोलाची अशी कामगिरी करत श्रीलंका आणि पाकिस्तान अंतिम फेरी यामध्ये पोहोचली आहे. हा सामना संयुक्त अरब यूएई येथे खेळला जाणार आहे. श्रीलंका अफगाणिस्तान विरोधात प्रभाव झाल्या नंतर एकही सामना हातातून गमावला नाही. ११ सप्टेंबरला प्रेक्षक संध्यकाळी ७.३० वाजता स्टार स्पर्ट्स १,२,३ हिंदी वर पाहू शकतात.

अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम यांनी खेळाडूंशी संवाद साधला. टूर्नामेंट एवढ्या पुढे कशी गेली आणि लंकन विरुद्धच्या ‘टफ’ फायनलकडून त्याच्या अपेक्षा याविषयी तो थोडक्यात बोलला. बाबर म्हणाले की, आशिया कप २०२२ च्या फायनलमध्ये जेव्हा दोन्ही बाजू एकमेकांना भिडतील तेव्हा त्यांना क्रिकेटच्या कठीण खेळाची अपेक्षा आहे. बाबरने टूर्नामेंट दरम्यान मोठे मन दाखविल्याबद्दल आणि महत्त्वपूर्ण वेळी पाऊल उचलल्याबद्दल आपल्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. या आशिया कपमध्ये काही खडतर प्रसंग आले. पण आपण सर्वानी याच्या वर मात केली अंतिम फेरी मध्ये पोहचलो आहोत. मी खूप उत्सुखं आहे आशिया कपचच्या अंतिम फेरी मध्ये खळण्याकरिता असे पाकिस्तान संघचे कर्णधार बाबर आझम यांनी म्हटले.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री शिंदे यांनी राजीनामा द्यावा, शिवसेनेचे अरविंद सावंत यांची मागणी

सुशांतचे ‘ब्रह्मास्त्र’ बॉलीवूडला उद्ध्वस्त करणार… सोशल मीडियावर या पोस्टची चर्चा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version