Thursday, July 4, 2024

Latest Posts

Australia Vs Team Indiaची दमदार खेळी; भारताने केला सेमीफायनलमध्ये प्रवेश

जगातला सर्वात आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. हा खेळ अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत खेळला जातो. त्यात हा खेळ म्हणजे अगदी आबालवृद्धांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यात सध्या हा विशेष सामना फार जोमाने सुरु आहे. अगदी सर्व मंडळी हा सामना झाडून पाहत आहेत.

जगातला सर्वात आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. हा खेळ अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत खेळला जातो. त्यात हा खेळ म्हणजे अगदी आबालवृद्धांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यात सध्या हा विशेष सामना फार जोमाने सुरु आहे. अगदी सर्व मंडळी हा सामना झाडून पाहत आहेत. तो म्हणजे टी २० विश्वचषक २०२४ (ICC T20 World cup 2024)  हा होय.

हा टी २० विश्वचषक २ जून २०२४ रोजी सुरु झाला आहे. या सामन्यात गेल्या काही दिवसांपासून भारत विजयाच्या दिशेने आगेकूच करत आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharama) ४१ चेंडूत ९२ धावांच्या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २०५ धावांचा डोंगर उभारला. ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला पण दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला (Australia) १८१ धावातच रोखलं. या विजयासह भारतीय संघाने सेमी फायनलमध्ये धडक मारली. ऑस्ट्रेलियाचं सेमी फायनलचं स्वप्न अफगाणिस्तान-बांगलादेश लढतीच्या निर्णयावर अवलंबून आहे. सेमी फायनलमध्ये भारताचा मुकाबला इंग्लंडशी होणार आहे. त्याचप्रमाणे भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन महत्वपूर्ण संघांमध्ये ‘करो या मारो’ अशी स्थिती उद्भवली आहे.

कुलदीप यादवने ग्लेन मॅक्सवेलला बोल्ड आउट केले,  तर अक्षर पटेलने मार्कस स्टॉइनसला बाद केले. दोन विकेट्ससह भारतीय संघाने दमदार पुनरागमन केलेले दिसून आले. कर्णधार मिचेल मार्श आणि भारताविरुद्ध दमदार कामगिरी करणारा ट्रॅव्हिस हेड यांनी चौकार-षटकारांनी चाहत्यांची मने जिंकली.  डावखुरा वेगवान युवा म्हणून ओळखला जाणारा गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh)  याने ऑस्ट्रेलियाच्या भरवशाच्या डेव्हिड वॉर्नरला पहिल्याच षटकात तंबूत पाठवले. वॉर्नरने ६ धावांची मजल मारली. कर्णधार रोहित शर्माच्या ४१ चेंडूत ९२ धावांच्या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०५ धावांनी आघाडी मिळवली. सेमी फायनल प्रवेशासाठी विजयी धुरा पटकावण्यासाठीची भारताची अर्धी मोहीम फत्ते झाली.ॲडम झंपाच्या गोलंदाजीवर जोरदार आक्रमणाच्या प्रयत्नात भारतीय फलंदाजांना जीवदान मिळाले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने हार्दिकचा झेल सोडला. दुबेचा फटका क्षेत्ररक्षकांच्या मध्यात पडला.

वर्ल्डकपच्या सुपर ८ दुसऱ्या गटाचं चित्र स्पष्ट झालं आहे. दक्षिण आफ्रिकेने रोमहर्षक लढतीत यजमान वेस्ट इंडिजला नमवत दिमाखात सेमी फायनल फेरीत प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेने स्पर्धेत ७ पैकी ७ सामने जिंकले आहेत. तर  दुसरीकडे इंग्लंडने अमेरिकेचा धुव्वा उडवत सेमी फायनल फेरी गाठली आहे. एकाक्षणी गतविजेत्या इंग्लंडला सुपर ८ टप्पा गाठता येणं खडतर दिसत होतं मात्र या फेरीत त्यांनी लौकिकाला साजेसा खेळ केला आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्याविरुद्ध कोण खेळणार हे काही तासात स्पष्ट होईल. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान-बांगलादेश सामन्यानंतर सेमी फायनलचं संपूर्ण चित्र कळेल. टी-२० विश्वचषक २०२४ मधील सुपर ८ फेरीतील अजून एक हायव्होल्टेज सामना भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळवला जाणार आहे. भारताने जर हा सामना जिंकला तर हा संघ थेट सेमीफायनलमध्ये धडकू शकणार आहे. आता संपूर्ण क्रिकेटप्रेमींचे लक्ष हे थेट सेमीफायनल (Semi-Final) कडे लागले आहे.

हे ही वाचा

PUNE HIT-AND-RUN: अपघाताप्रकरणी एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना केले मोठे आवाहन..

JOB VACANCY: BOMBAY HIGH COURT मध्ये आली आहे नवी जॉबची संधी; जाणून घेऊ सविस्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss