Friday, July 5, 2024

Latest Posts

सूर्यकुमार यादवचं मराठीत भाषण करत मुंबईतल्या गर्दीवर केले भावनिक भाष्य

या कार्यक्रमात टीम इंडियाचा खेळाडू सूर्यकुमार यादव याने मराठीत भाषण केलं. सूर्यकुमार इतकं छान मराठी बोलला की अनेकांचे चेहरे आश्चर्यचकीत झाले. सूर्याने अतिशय ठणकेबाज मराठीत सर्व आमदारांचं मन जिंकलं.

Team India : टीम इंडियाने ११ वर्षानंतर आयसीसी चषकावर नाव कोरलं. तसेच १७ वर्षानंतर टी२० वर्ल्डकप भारताने जिंकला आहे. विजयानंतर टीम इंडिया भारतात पोहोचली तेव्हा त्यांनी सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आता विश्वविजेता रोहित शर्मा, ऑलराउंडर शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैयस्वाल यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. आज वर्षा निवसस्थानी रोहित शर्मा आणि इतर खेळाडू आले होते.हा सत्कार सोहळा पार पडला. त्यावेळी शाल आणि श्रीफळ देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा सन्मान केला. त्यांनतर हे चारही खेळाडू विधानभवनात गेले. राज्याच्या विधानभवनात (Vidhan Bhavan) आज जगजेत्त्या भारतीय क्रिकेट संघातील (T20 World Cup 2024 Winning Team India) मुंबईकर खेळाडूंचा सत्कार पार पडला. विधान भवनात पहिल्यांदा असा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. खेळाडूंसाठी विधान भवनाच्या प्रांगणात लोककलाकार जमले होते. खेळाडू पोहचताच तुतारी वाजवून त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर त्यांना पुष्पगुच्छ देण्यात आलं. त्यानंतर लोककलाकारांनी या खेळाडूंचं औक्षण केलं. त्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये आता या खेळाडूंचा खास सन्मान करण्यात येणार आहे. खेळाडू सेंट्रल हॉलमध्ये पोहचताच महाराष्ट्र गीत लावण्यात आलं. त्यानंतर दिग्गज सुनील गावस्कर यांनी गायलेलं गाणं लावण्यात आलं. या कार्यक्रमात टीम इंडियाचा खेळाडू सूर्यकुमार यादव याने मराठीत भाषण केलं. सूर्यकुमार इतकं छान मराठी बोलला की अनेकांचे चेहरे आश्चर्यचकीत झाले. सूर्याने अतिशय ठणकेबाज मराठीत सर्व आमदारांचं मन जिंकलं.

 

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब धन्यवाद, तुम्ही आम्हाला ही संधी दिली. सर्वांना भेटून खूप चांगलं वाटत आहे. जे मी काल बघितलं ते मी कधी विसरु शकत नाही. तसेच मी इथेसुद्धा आज बघतोय, इथलेदेखील क्षण मी कधी विसरु शकत नाही. थँक्यू सो मच. मी काय म्हणू? माझे शब्द संपले आहेत. मला माहिती नाही, मला काय बोलायचं, थँक्यू सो मच”, अशा शब्दांत सूर्यकुमार यादव याने आपल्या भावना व्यक्त केल्या. “इकडे येऊन खूप चांगले वाटले. आमचे बीसीसीआयचे ट्रेझर आशिष शेलार हे सुद्धा काल आम्हाला घ्यायला आले होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी जे काल बघितलं, आपल्या मुंबई पोलिसांनी जे काल केलंय, ते मला वाटत नाही की, कोणी असं करु शकतं. आम्हाला असंच प्रोत्साहन मिळेल, अशी आशा करतो. नंतर परत आपण अजून एक वर्ल्ड कप जिंकू”, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

हे ही वाचा:

 
 
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss