Thursday, July 4, 2024

Latest Posts

T-20 World Cup 2024: Team India मुंबईत येणार, Victory Parade ची जोरदार तयारी, कुठे पाहता येणार?

T 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघ पाच दिवसांनी भारतात दाखल झाला आहे. बार्बोडोसमध्ये आलेल्या हरिकेन बेरीज चक्रीवादळामुळे टीम इंडिया (Team India) च्या भारतातील आगमनाला उशीर झाला. आज 4 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास टीम इंडिया स्पेशल विमानाने दिल्ली विमानतळावर दाखल झाली. भारतीय संघाला इकडे परत आणण्यासाठी बीसीसीआय (BCCI) कडून खास स्पेशल विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होताच विजेत्या टीमचे थाटामध्ये स्वागत करण्यात आले. भारतातील चाहते मागील पाच दिवसांपासून भारतीय संघाची आतुरतेने वाट पाहत होते. टीम इंडिया आयटीसी मोरया हॉटेलमध्ये उतरली असून टीम इंडियाचे हॉटेलमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी सचिव जय शाह आणि टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) या तिघांनी मिळून केक कापून जल्लोष साजरा केला.

भारतीय संघाचा खेळाडू या हॉटेलमध्ये फ्रेश होऊन त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासोबत भेटीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. दिल्लीमध्ये मान्यवरांची भेट घेतल्यानंतर विजेता ट्रॉफीसह टीम इंडियाचे खेळाडू मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. वर्ल्ड कप विजेता टीम से मुंबईत जल्लोषात स्वागत करण्याची तयारी करण्यात आली आहे. यापूर्वी 2007 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या विश्वविजेता टीमची मुंबईत भव्य विक्ट्री परेड काढण्यात आली होती आणि आता आज पुन्हा मुंबईत अशीच एक भव्य परेड निघणार आहे. मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम हा मुंबईतील टीम इंडियाच्या विक्ट्री परेडचा मार्ग असणार आहे. संध्याकाळी पाच वाजता निघणाऱ्या विक्री परेडमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जवळपास दोन तास ही विक्ट्री परेड चालण्याची शक्यता आहे. एका मोकळ्या बसमधून ही विक्ट्री परेड काढण्यात येणार आहे. याबाबतची माहिती रोहित शर्माने यांनी त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा दिली आहे. आम्ही तुमच्या सर्वांसोबत या खास क्षणाचा आनंद घेऊ इच्छितो. चला तर मग 4 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून मरीन ड्राइव्ह आणि वानखेडे स्टेडियम येथे विक्ट्री परेडसह हा विजय साजरा करूया. वर्ल्डकप घरी येत आहे. अशी पोस्ट रोहित शर्मा याने केली आहे.

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या स्टार स्पोर्ट्स वन आणि स्टार स्पोर्ट्स वन हिंदी या क्रीडा वाहिन्यांवर सकाळी नऊ वाजल्यापासून विक्ट्री परेडच्या, टीम इंडियाच्या सर्व घडामोडी पाहता येणार आहेत.स्टार स्पोर्ट्स यांच्या यूट्यूब चॅनेलवर सुद्धा लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात येणार आहे. बीसीसीआय.टीव्ही BCCI.TV वर सुद्धा चाहत्यांना विक्ट्री परेड पाहण्याची संधी मिळणार आहे.

हे ही वाचा:

Health Is Wealth : Smart Phone ठरतोय घातक ; हातावर होतोय वाईट परिणाम

Nana Patole लढवणार MCA ची निवडणूक, ट्विट करत दिली माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss