IND vs SA : तिसरा T२० सामना हरल्यानंतर रोहितनं संघाविषयी दिली प्रतिक्रिया म्हणाला- ‘बॉलिंगवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे’

IND vs SA : तिसरा T२० सामना हरल्यानंतर रोहितनं संघाविषयी दिली प्रतिक्रिया म्हणाला- ‘बॉलिंगवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे’

टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात 49 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने झटपट धावा केल्या आणि २० षटकांत २२७ धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात भारतीय संघ १७८ धावांवर गारद झाला. सामना संपल्यानंतर रोहित शर्माने पराभवाचे कारण आपल्या संघाच्या खराब गोलंदाजीवर फोडले. तो म्हणाला की, आपल्याला गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

रोहित शर्मा म्हणाला, ‘आम्हाला आमच्या गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करावे लागेल. पॉवरप्लेमध्ये आपण कोणते पर्याय वापरून पाहू शकतो, मधल्या आणि डेथ ओव्हर्समध्ये आणखी काय करू शकतो. यावर काम करावे लागेल. आम्ही अलीकडे दोन महान संघांसोबत मालिका खेळली आहे. आता या सामन्यांचे विश्लेषण करून आणखी काय चांगले होऊ शकते ते पहावे लागेल.

हेही वाचा : 

Nana patole : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा दर्शवणार

गेल्या काही सामन्यांमध्ये टीम इंडियाची गोलंदाजी कमकुवत झाली आहे. आशिया चषकापासून ते ऑस्ट्रेलिया मालिकेपर्यंत आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांनी जोरदार मुसंडी मारली. विशेषत: डेथ ओव्हर्स ही टीम इंडियासाठी सर्वात मोठी समस्या आहे. अर्शदीपपासून हर्षल पटेल आणि भुवनेश्वर कुमारपर्यंत प्रत्येक गोलंदाज शेवटच्या षटकांमध्ये धावा लुटत आहे.

आफ्रिकन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीच्या पार चिंधड्या उडवल्या. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थित संघात सामील झालेला मोहम्मद सिराज फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. तो देखील खूप महागात पडला. त्यामुळे रोहित शर्मा समोर ही फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही प्रकारात भारतीय संघ कमी पडला. यानंतर आता भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ६ ऑक्टोबर रोजी लखनऊ येथे खेळला जाणार आहे.

महिलांना निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्यासह सक्षम करण्याची गरज: दसरा कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत

Exit mobile version