Saturday, June 29, 2024

Latest Posts

T20 Word Cup 2024 IND vs SA Final: Rohit Sharma, Virat Kohli खेळणार शेवटचा T20 सामना? भारतीय संघ ट्रॉफी उंचावणार का?

भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसण्याची लक्षणे असून कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) यांचा हा शेवटचा टी २० सामना असू शकतो.

टी २० वर्ल्डकप २०२४ चा अंतिम सामना (T20 Word Cup 2024 IND vs SA Final) आज (शनिवार,२९ जून) रंगणार असून आपल्या भारतीय संघाचा (Indian Cricket Team) सामना घातक संघ समजल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिके (South Africa Cricket Team) विरुद्ध होणार आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष या सामन्याकडे लागून राहिले आहे. २००७ साली टी २० विश्वचषक जिंकल्यानंतर भारत आतापर्यंत टी २० वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकू शकला नाही आहे. त्यामुळे आता तब्बल १७ वर्षांनंतर भारतीय संघ वर्ल्डकपला गवसणी घालेल का? असा प्रश्न करोडो क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. अश्यातच आता भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसण्याची लक्षणे असून कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) यांचा हा शेवटचा टी २० सामना असू शकतो.

आज होणाऱ्या अंतिम सामन्यात स्पर्धेतील सर्वात बलाढ्य संघांपैकी एक समजल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचे कडवे आव्हान भारतासमोर असणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिका संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. त्यामुळे वर्ल्डकप ट्रॉफी उंचावण्यासाठी तेदेखील जोर लावतील. मुख्य म्हणजे भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ हे जोरदार फॉर्म मध्ये असून आतापर्यंत त्यांनी स्पर्धेत पराभवाचा सामना केलेला नाही. अश्यातच वर्ल्ड कपच्या शेवटच्या टप्प्यात कर्णधार रोहित शर्मा याला फॉर्म गवसल्यामुळे भारतीय चाहते खुशीत आहेत. परंतु, विराटला मात्र अद्याप फॉर्म सापडलेला नाही. कोहलीची बॅट या स्पर्धेत तळपलेली दिसली नाही. त्यामुळे रोहित आणि विराट यांनी अंतिम सामन्यात चांगला खेळ करून संघाला जेतेपद मिळवून द्यावे अशी भारतीय चाहत्यांची इच्छा आहे.

असे असतानाच, दुसरीकडे मात्र बीसीसीआय (BCCI) या वर्ल्डकपनंतर मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे आधारस्तंभ असलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना टी २० प्रकारातून वगळण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या दोघांसह स्टार ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यालादेखील टी २० मधून वगळण्यात येणार असल्याचे समजते. या वर्ल्डकपनंतर संघातील युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यासाठी बीसीसीआय हा निर्णय घेणार असल्याचे समजते. त्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांचा हा शेवटचा टी २० सामना असू शकतो अश्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्यामुळे हा वर्ल्डकप जिंकून भारतीय संघाने आपल्या लाडक्या खेळाडूंना ट्रिब्यूट द्यावा, अशी भारतीय चाहत्यांची इच्छा आहे. असे असले तरी याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

हे ही वाचा:

तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर Team India जिंकली, CM Shinde यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव

India Vs England: टीम इंडियाची बाजी, अंतिम सामन्यासाठी खेळाडू सज्ज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss