spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

T20 World Cup 2022 : जसप्रीत बुमराहच्या जागी ‘या’ गोलंदाजाचा टीममध्ये समावेश

मागच्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट (Indian Cricket) वर्तुळात जसप्रीत बुमराहच्या जागी कोणाला संधी मिळणार? याची चर्चा सुरु होती. विविध तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर टीम इंडियात जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) जागी रिप्लेसमेंटची घोषणा करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा (Mohammed Shami) बुमराहच्या जागी मेन स्क्वाडमध्ये समावेश करण्यात आला आहे.

मागच्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट (Indian Cricket) वर्तुळात जसप्रीत बुमराहच्या जागी कोणाला संधी मिळणार? याची चर्चा सुरु होती. विविध तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर टीम इंडियात जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) जागी रिप्लेसमेंटची घोषणा करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा (Mohammed Shami) बुमराहच्या जागी मेन स्क्वाडमध्ये समावेश करण्यात आला आहे.

बीसीसीआय सचिव जय शहा यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे दुखापतीमुळे वर्ल्डकप संघातून बाहेर गेलेल्या जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमीची संघात निवड झाल्याची घोषणा केली. आयसीसीकडे रिप्लेसमेंटचे नाव देण्याची शेवटची तारीख ही १५ ऑक्टोबर होती. त्याच्या एक दिवस आधी बीसीसीआयने आपल्या संघातील बदल जाहीर केला. प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहेत की, ‘भारतीय वरिष्ठ संघ निवडसमितीने आयसीसी टी २० वर्ल्डकपसाठीच्या संघातील जसप्रीत बुमराची रिप्लेसमेंट म्हणून मोहम्म शमीची निवड केली आहे. मोहम्मद शमी आधीच ऑस्ट्रेलियामध्ये पोहचला आहे. तो ब्रिसबेनमध्ये संघाशी जोडला जाईल.

याचबरोबर बीसीसीआय मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांना स्टँड बाय खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाला पाठवणार आहे. यापूर्वी स्टँडबायमध्ये दीपक चाहरचे नाव होते. मात्र तो दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या ऐवजी शार्दुल ठाकूरला स्टँड बायमध्ये ठेवण्यात आले आहे. मोहम्मद सिराजने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत प्रभावी मारा करत मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता. त्यामुळे त्याची स्टँड बाय खेळाडू म्हणून वर्णी लागली आहे.

 भारताचा वर्ल्डकपसाठीचा सुधारित संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

स्टँड बाय :
मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर

हे ही वाचा :

Andheri By Poll Election 2022 : “…पक्षाचं नाव बदलून ‘रडकी सेना’ असं ठेवावं” आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

Andheri By Poll Election 2022 : अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक आम्ही जिंकूच – चंद्रशेखर बावनकुळे

Andheri East Bypoll 2022 : उमेदवार अर्ज दाखल करण्यापूर्वी ठाकरे गट व भाजपचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss