spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

T20 World Cup 2022 : सेमी फायनलसाठी पाकिस्तानचा मार्ग मोकळा आता भारताचं काय ?

T२० विश्वचषक सुपर १२ च्या ३६ व्या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २० षटकात ९ विकेट गमावत १८५ धावा केल्या. या सामन्यात अनुभवी सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम ही सलामीची जोडी फ्लॉप ठरली. एका वेळी ४३ धावांच्या एकूण धावसंख्येवर पाकिस्तानने चार विकेट गमावल्या होत्या. यानंतर इफ्तिखार अहमद आणि शादाब खान यांनी अर्धशतके झळकावत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. या सामन्यात पाकिस्तानने सलग तीन विकेट गमावल्या, तरीही गोलंदाजाची हॅट्ट्रिक झाली नाही.

पाकिस्तानच्या डावाच्या १९व्या षटकातील पाचव्या चेंडूवर वेगवान गोलंदाज एनरिक नोर्कियाने शादाब खानला ट्रिस्टन स्टब्सच्या चेंडूवर डीप मिडविकेटवर झेलबाद केले. पुढच्याच चेंडूवर नोर्कियाने टेम्बा बावुमाच्या हाती मोहम्मद वसीमला झेलबाद करून पाकिस्तानला सातवा धक्का दिला. यानंतर २०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कागिसो रबाडाने इफ्तिकार अहमदला रिले रुसोकरवी झेलबाद करून पाकिस्तानला आठवा धक्का दिला. अशा प्रकारे, दोन्ही गोलंदाजांनी मिळून सलग ३ विकेट घेतल्या, ज्यामुळे हॅट्ट्रिक करता आली नाही.

हेही वाचा : 

महिला पत्रकाराला कुंकू लावण्यास सांगणारे संभाजी भिडे समाजातली विकृती; नाना पटोले

आता ग्रुप २ मधील प्रत्येक संघाचे ४ सामने झाले असून अजून एक सामना शिल्लक आहे. नेदरलँड आणि झिम्बाब्वे जवळपास सेमी फायनलच्या रेसमधून बाहेर गेले आहेत. मात्र भारत, दक्षिण आफ्रिका तसेच पाकिस्तान आणि बांगलादेशलाही सेमी फायनल गाठण्याची संधी आहे. पाकिस्तानने हा सामना जिंकल्यावर गुणतालिकेत ते थेट तिसऱ्या स्थानावर गेले आहेत. तसंच त्यांचा नेट रनरेटही +१.४४१ इतका झाल्यामुळं ते स्पर्धेत मजबूत स्थितीत आले आहेत. भारत अव्वलस्थानी असला तरी नेटरनरेटच्या बाबतीत भारत पाकिस्तानच्या मागे आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. हे तीन संघच सेमीफायनलच्या शर्यतीत पुढे असून नेदरलँड, झिम्बाब्वे यांचं आव्हान जवळपास संपलं आहे. बांगलादेशचंही पुढे पोहोचणं अवघड आहे.

कोल्हापुरात मनी लॉन्ड्रिंगच्याच पैश्याची लूट

जर भारताचा विचार केला तर भारताच्या दृष्टीकोणातून झिम्बाब्वेचा सामना जिंकणे खूप गरजेचे आहे. कारण आजच्या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला मात देऊन आपले रनरेट देखील सुधारले आहे. जर भारत हा सामना हरला आणि पाकिस्तानने बांगलादेशला मात देत दोन गुणांची कमाई केली तर भारत आणि पाकिस्तान समान 6 गुणांवर येतील आणि सरस रनरेटच्या जोरावर पाकिस्तान सेमी फायनलमध्ये पोहचेल. याच परिस्थितीत जर दक्षिण आफ्रिका नेदरलँडकडून पराभूत झाली तर मात्र पाकिस्तान आणि भारत सेमी फायनलमध्ये जाण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानच्या रॅलीत इम्रान खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर भारत बारीक लक्ष ठेवून आहे: परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

Latest Posts

Don't Miss