Tuesday, July 2, 2024

Latest Posts

T20 World Cup 2024 : ‘या’ ४ संघांनी उपांत्य फेरीत मारली धडक, जाणून घ्या कधी आणि कोण येणार आमनेसामने

२०२४ T20 विश्वचषक आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. भारत, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

T20 World Cup 2024 Semi Final Matches : २०२४ T20 विश्वचषक आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. भारत, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता भारतीय वेळेनुसार पहिला उपांत्य सामना दिनांक २७ जून रोजी सकाळी ६ वाजता तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना रात्री ८ वाजता होणार आहे. २९ जून रोजी रात्री ८ वाजता विजेतेपदाचा सामना सुरू होईल.

२०२४ T20 विश्वचषक स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. म्हणजेच पावसाने व्यत्यय आणल्यास हा सामना दुसऱ्या दिवशी खेळवला जाईल. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सुपर-8 चे सर्व सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली आहे. अफगाणिस्तानने सुपर-8 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. २०२४ टी-20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. भारतीय वेळेनुसार २७ जून रोजी रात्री ८ वाजल्यापासून खेळला जाईल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना गयाना येथील प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. पावसामुळे सामना विस्कळीत झाला तर सामना पार पाडण्यासाठी सुमारे ४ तासांचा अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला आहे. भारतीय संघाने सुपर-८ मध्ये आपले सर्व सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली आहे. टीम इंडिया या स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य आहे. तर इंग्लंड संघाने सुपर-8 मध्ये यूएसए आणि वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे.

तर गयानामध्ये २७ जूनच्या रात्री पाऊस पडण्याची जोरदार शक्यता आहे. या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस नाही. अशा परिस्थितीत भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा दुसरा सेमीफायनल सामना पावसामुळे वाहून गेला तर टीम इंडिया फायनलमध्ये प्रवेश करेल. आयसीसीच्या नियमांनुसार, जर उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे रद्द झाला, तर सुपर-8 च्या गुणतालिकेत अव्वल असणारा संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.

हे ही वाचा

PUNE HIT-AND-RUN: अपघाताप्रकरणी एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना केले मोठे आवाहन..

Chandrakant Patil यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर Rohit Pawar आणि Amol Mitakari संतापून म्हणाले, दादा तुम्ही….

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss