ऐतिहासिक विजयानंतर ‘या’ खेळाडूंचा T20 World Cup ला अलविदा

रोहित शर्माची कॅप्टन म्हणून पहिली आणि खेळाडू म्हणून दुसरी टी २० वर्ल्ड कप ट्रॉफी ठरली. टीम इंडियाने १७ वर्षांपूर्वी म्हणजेच २००७ साली पहिलाच टी २० वर्ल्ड कप जिंकला होता.

ऐतिहासिक विजयानंतर ‘या’ खेळाडूंचा  T20 World Cup ला अलविदा

भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी २० वर्ल्ड कप २०२४ (ICC T20 World Cup 2024) फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १७७ धावांचं आव्हान दिले होते. मात्र, टीम इंडियाने धारदार गोलंदाजी आणि अफलातून फिल्डिंगच्या जोरावर मॅच फिरवली. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला १६९ धावांवर रोखण्यात यश मिळवलं. टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात टी २० वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. रोहित शर्माची कॅप्टन म्हणून पहिली आणि खेळाडू म्हणून दुसरी टी २० वर्ल्ड कप ट्रॉफी ठरली. टीम इंडियाने १७ वर्षांपूर्वी म्हणजेच २००७ साली पहिलाच टी २० वर्ल्ड कप जिंकला होता.

भारताला दुसऱ्यांदा टी २० वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवून दिल्यानंतर भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली या दोघांनी मोठा निर्णय घेतला आहे. या दोन्ही दिग्गजांनी टी २० वर्ल्ड कप अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहितने यापुढे वन-डे आणि टेस्ट क्रिकेट खेळत राहणार असल्याचं जाहीर केले आहे. आयसीसीने सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली आहे.

विराट कोहलीने विजयानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान बोलताना आपण क्रिकेटच्या या छोट्या फॉर्मेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केले आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाच्या खेळाडूंनी विजयाचा जल्लोष करायला सुरुवात केली. एकमेकांनी गळाभेट देत अभिनंदन केले. तेच सर्व भारतीय संघाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. काही वेळाने विराट पाठोपाठ रोहित शर्मानेही टी २० क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केले. विराट रोहितसारखी अनुभवी आणि माजी कर्णधारांची जोडी निवृत्त झाल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे तर आपले दोन लाडके खेळाडू वर्ल्ड कप सह निवृत्त होत असल्याचा आनंदही आहे. तसेच रोहित आणि विराटने अगदी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. विराट आणि रोहितच्या निर्णयामुळे आता टी २० वर्ल्ड कपमध्ये नव्या आणि युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे.

हे ही वाचा:

T-20 WORLD CUP मध्ये विजयी झाल्यानंतर MS Dhoni कडून टीमचे कौतुक, म्हणाला…

T-20 World Cup मध्ये भारताची बाजी, ठरले ‘इतक्या’ रकमेचे मानकरी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version